काय आहे गुगल च्या मनात?
गुगल कुणाला या नावाची ओळख करुन द्यावी लागेल? माझ्या ब्लॉगच्या वाचकाला तर नक्किच नाहि. ईंटरनेटवर काहि शोधायचे आहे? उघडा गुगल. मित्राला ईमेल पाठवायचा आहे, गुगलचेच जीमेल, नविन मित्र जमवायचे आहेत, जुन्या मित्रांशी संपर्क साधायचा आहे, गुगलचेच ऑर्कुट, फोटो शेअर करायचाय, गुगलचेच पिकासा, विडिओ पहायचा आहे, गुगलचेच यू-ट्युब, बातम्या वाचायच्या आहेत, गुगलचेच न्युजरिडर. जेकाहि ऑनलाईन करताय त्या सगळ्या साठी गुगल तुमच्या सेवेसाठि हजर आहे.
नक्कि गुगलला करायचे काय आहे? सगळी कडे आपण गुगलच पाहतोय. हि एक विडीओ फिल्म आहे ज्या मध्ये आगामी काहि वर्षात गुगलकडे आपली सगळी माहिती असेल आणि त्याचा वापर गुगल कसा करेल हे दाखवण्यात आलाय. यात जे दाखवण्यात आलेय तोच जर खरच गुगलचा विचार असेल तर हि गोष्ट नक्किच भीतीदायक आहे. पहा हा विडीओ (चलचित्रफीत) आणि बघा आपले लाडके गुगल नक्कि काय करु ईच्छिते (?). तुम्हाला आवडेल का हे?
One Comment
Leave a Reply