हे “ट्विटर” म्हणजे काय हो?

ट्विटर? हे काय आहे? किंवा हे ट्विटर काय आहे मला समजतच नाहि.
जेंव्हा मी ट्विटर बद्दल माझ्या मिंत्रांना किंवा परिवारातील एखाद्या सदस्याला विचारतो हि उत्तरे मला अनेक वेळा मिळतात. आणि जेंव्हा मी विचारतो कि तु ट्विटर वापरतोस का, तर त्याचे ऊतर असते कि मि का वापरु?
ट्विटर म्हणजे ‘मायक्रो-ब्लॉगींग’:
मायक्रो-ब्लॉगींग म्हणजे अतिशय कमी शब्दात आपले म्हणणे मांडणे आपल्या बद्दल अपडेट करणे. खरे म्हणजे हि तर फेसबुक ची खासियत पण याला खरे नावरूप मिळवुन दिले ते ट्विटरनेच. मला ब्लॉगींग कराय्चे आहे पण वेळ नाहिए, किंवा जास्त लिहु शकत नाहिए काळजी नको मायक्रो-ब्लॉगींग आहे ना. एक तास पुर्ण बसुन जे ब्लॉगवर एक लेख लिहु शकणार नाहित ते फक्त अपडेट देऊ शकतात जसे कि.. “आज लिहायचा कंटाळा आला आहे.. आज सुट्टी घेणार आहे” अथवा “ति मला खुपच आवडते मी काय करु?”
ट्विटर म्हणजे ‘सोशल मेसेजींग’:
ट्विटर चा अपेक्षीत उपयोग म्हणजे मायक्रो-ब्लॉगींग पण तेवढ्यावर मर्यादीत न राहता आता ट्विटर म्हणजे एक सोशल मेसेजींग टुल झाले आहे. आपण ट्विटर वापरुन सर्वांपर्यंत एकच संदेश एकाच वेळी पोहचवु शकता. ‘फॉलोअर्स’ आणि ‘फॉलो’ यामुळे ट्विटर हे एक मित्रांचे जाळे म्हणुन सुद्धा वापरु शकता. बघा तुम्हि किती फॉलोअर्स मिळवु शकता ते.
ट्विटर म्हणजे बातमीदारः
कोणतीहि वॄत्तवाहिनी चालू करा. खाली तुम्हाला संक्षीप्त बातम्या एका ओळित फिरताना दिसतील. तश्या संक्षीप्त बातम्या म्हणजे ट्विटर. तुम्ही अत्ता काय करत आहात? या प्रश्नाचे उत्तर फक्त देण्या ऐवजी लोकं इथे आपल्या आजुबाजुच्या घडामोडि सुद्धा नोंदवतात, जसे कि या या जागेच्या इमारतीला आग लागली. इकडे भु़कंप जाणवला इत्यादी इत्यादी. ट्विटर वापरुन एकाच वेळि अनेक जणांना बातमी पोहचवता येते. मग आपल्या भागातल्या घडामोडी पोहचवणार ना आता जगाच्या कानाकोपर्यात?
ट्विटर म्हणजे मार्केटिंगः
मार्केटिंग जगतात ट्विटर खुपच आवडिचे माध्यम होऊ लागले आहे. आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपला संदेश पोहचण्याचा हा अगदी स्वस्त आणि नवीन पर्याय आहे. आपल्या प्रियजनांशी संपर्कात राहण्यासाठी, हॉलीवुड्-बॉलीवुड जगतातील सितारे असोत कि थेट अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा असोत यांनी वेळोवेळी ट्विटरचा सहारा घेतला आहे.
ट्विटर हे वेगवेगळ्या लोकांसांठी वेगवेगळा अर्थ घेऊन वापरता येते. कुणासाठी हे कुटूंबाच्या संपर्कात राहण्याचे माध्यम आहे, व्यावसायीक लोकांसाठी हे व्यवसाय वाढवण्याचे तंत्र आहे तर लेखकांसाठी आपल्या वाचकांशी जोडणारा दुवा आहे.
मग आता तरी चालु करताय ना ट्विटर वापरणे?
Follow ME on Twitter.
आपलाच मित्र,
आशिष कुलकर्णी
Author: Ashish Kulkarni
What is twitter? learn Twitter
12 Comments
Leave a Reply