फिलीपिन्स सरकारतर्फे देण्यात येणारा यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार सामाजिक चळवळीत रमणाऱ्या दीप जोशी यांना जाहीर झाला. अन, एकदम दीप जोशी हे नाव प्रकाशझोतात आले. देशाच्या ग्रामीण भागाच्या स्वयंपूर्णतेसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि संस्थांना दीप जोशी हे नाव नवखे नाही. तीस वर्षांहूनही अधिक काळ ते समाजकारणात कार्यरत आहेत. अमेरिकेतील मॅसॅच्युएटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून त्यांनी इंजिनिअरींगचा अभ्यासक्रम पुरा केला. तसेच सोलनस्कूल येथून त्यांनी व्यवस्थापनातील पदवी प्राप्त केली. मुळातच सामाजिक कामांची आवड असणाऱ्या श्री. जोशी यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सामाजिक कार्याचा धडा गिरवला आहे. त्यात सिस्टिम रिसर्च इन्स्टिट्यूट आणि फोर्ड फाउंडेशन यांचा समावेश आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळवून इतकी वर्षे झाल्यानंतरही ग्रामीण भागाची भीषण अवस्था त्यांना स्वस्थ बसू देईना. ग्रामीण भाग हेच आपले जीवितध्येय समजून त्यांनी १९८३ मध्ये नवी दिल्ली येथे प्रदान (PRADAN) या संस्थेची स्थापना केली. आज देशातील सातपेक्षा अधिक राज्यांमधील सुमारे ३०४४ पेक्षां ही जास्त खेड्यांमध्ये संस्थेचे कार्य विस्तारले आहे. ग्रामीण भागांची स्वयंपूर्णता याविषयावर वाहून घेतलेल्या या संस्थेतर्फे महिला सक्षमी करणासाठी बचत गट, गावे रोजगारक्षम करणे, अपारंपरिक साधनांच्या मदतीने उर्जा निर्माण करणे आदी बाबींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. आगामी दहा वर्षांत देशभरातील आणखी दीड कोटी सामान्य जनतेपर्यंत पोचण्याचा संस्थेचा मानस आहे.
संस्थेचे आधारस्तंभ
ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करून, शहरीकरणाचा वाढता वेग नियंत्रणात आणणे हे काही येरा गबाळ्याचे काम नव्हे. ही कामे स्वत:च्या खांद्यावर झेलून उद्दिष्टाप्रत पोचविण्यासाठी संस्थेचे अनेक तरुण कार्यकर्ते सज्ज आहेत. तरुण कार्यकर्त्यांची संघटना अशी प्रदानची दुसरी ओळख आहे. संस्थेकडे असणाऱ्या एकूण कार्यकर्त्यांची कामाच्या दृष्टीने ३१ तुकड्यांमध्ये विभागणी करण्यात आली असून, या तुकड्या देशाच्या निरनिराळ्या भागात कार्यरत आहेत. देशाच्या दूर दुर्गम भागातील आदिवासी आणि इतर जमातींसाठीही प्रदानचे कार्यकर्ते सक्रीय आहेत.
महिला सक्षमीकरणासाठी बचतगट चळवळ
संस्थेच्या आकडेवारीनुसार राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि ओरिसा या सात राज्यात मिळून सध्या ७ हजार ५१२ महिला बचतगट संस्थेअंतर्गत कार्यरत आहेत. त्याचा लाभ सुमारे एक लाख सात हजार ग्रामीण कष्टकरी महिला घेत आहेत. या बचतगटांच्या माध्यमातून सुमारे २२.५० कोटी रुपयांची बचत करण्यात या महिलांना यश आले आहे. या आर्थिक सुबत्तेच्या गंगेचे व्यवस्थापन करण्यासाठी संस्थेतर्फे काही महिलांना संगणक प्रशिक्षित करण्यात आले आहे.
साधनसंपत्ती रक्षण
प्रदान संस्थेचे कार्य प्रामुख्याने आदिवासीबहुल राज्यात चालू असल्याने त्यांचा संबंध आदिवासी, जंगले आणि साधनसंपत्तीशी येतो. नैसर्गिक साधनसंपत्तीला कोणताही धोका न पोचविता त्यापासून मिळणाऱ्या पदार्थांची विक्री आणि विपणन करण्याचे आधुनिक शिक्षण या बांधवांना देण्यात येते. याशिवाय शेतीच्या आधुनिक पद्धती, फळबागा व्यवस्थापन आणि माती तसेच पाण्याचे व्यवस्थापन, पाळीव प्राण्यांची निगा, दुग्धोत्पादन, शेळीपालन, कुकुटपालन आणि अळिंबी उत्पादन याविषयी ग्रामीण बांधवांना प्रशिक्षित करण्यात येते.
सध्याच्या काळात देशात भारत आणि इंडिया यांच्यातील दरी वाढत असताना खऱ्या अर्थाने ग्रामीण भारताला सक्षम करणाऱ्या प्रदान संस्थेला आणि त्यांच्या हजारे तरुण दमाच्या कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा….. अशा या संस्थे
khoop changalee mahitee aahe.
prakash
मला फक्त दीप जोशी & रॅमन मॅगसेसे पुरस्कार
एवडेच माहिती होते.
पण पूर्ण माहिती आत्ता मिळाली.
धन्यवाद …………
This Raman Magsese award regarding information is very precious and very important for competitive examination like MPSC, UPSC, NET, SET, RAILWAY recruitment.
Thank you