ब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा
पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आता ठाणे महानगरपालिकेनेही दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नाव बदलून संभाजी ब्रिगेड आणि तत्सम संघटनांपुढे मान तुकवावी, अशी आशा आहे. वास्तविकतः दादोजी कोंडदेव हे ब्राह्मण होते आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून ब्राह्मण इतिहासकारांनीच रंगविले, असा आक्शेप घेत संभाजी ब्रिगेड आणि त्यांच्या सहकारी संघटना थयथयाट करीत आहेत. पण हा विषय फक्त दादोजी कोंडदेव यांच्यापुरताच मर्यादित आहे का, तर नाही. हा विषय त्याही पुढे जाऊन ब्राह्मणविरोधाला जाऊन भिडतो.
ब्राह्मणवैरामुळेच समर्थ रामदासांना विरोध, वासुदेव बळवंत फडके पहिले क्रांतिकारक नव्हते तर उमाजी नाईक होते, लोकमान्य टिळकांनी नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवजयंतीला सुरवात केली, अफझलखानाकडे कुलकर्णी आडनावाचा कोणी माणूस चाकरीस होता, या गोष्टी वारंवार पुढे आणून ब्राह्मण समाजावर आसूड ओढण्याचा प्रयत्न होतो आहे. पुस्तके लिहून नवा इतिहास बिंबविण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सेतुमाधव पगडी, बाबासाहेब पुरंदरे आणि निनाद बेडेकर हे ब्राह्मण असल्यामुळेच त्यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे, हे आता ओपन सिक्रेट आहे. अर्थात, १९४८ पासून (गांधी हत्येनंतर) ब्राह्मण समाज अशा प्रकारची टीका, निंदा सहन करत आला आहे. त्यामुळे हे नवीन आहे, असे वाटण्याचे काहीच कारण नाही. सत्तेतही त्यांचेच राजे (जाणते असूनही अजाणतेपणाचा बुरखा घेऊन वावरणारे) असल्यामुळे संभाजी ब्रिगेडला आयती संधी आहे. असो.
पण या निमित्ताने मला गेल्या काही दिवसांपासून मांडायचं होतं ते मांडण्याची संधी मिळाली आहे. सर्वप्रथम ब्रिगेडने जी मोहिम उघडली आहे ती स्तुत्य, कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. पण ब्रिगेडने त्यांचे हे ब्राह्मणवैर इथेच थांबवू नये, अशी माझी मागणी आहे. त्यामध्ये ब्रिगेड आणि त्यांच्या सहकारी संघटना यशस्वी झाल्या तरच त्या कौतुकास पात्र आहेत.
पहिले म्हणजे ज्याप्रमाणे ब्रिगेडने दादोजी कोंडदेव यांचे नामोनिषाण इतिहासातून मिटविण्याचा प्रयत्न चालविला आहे, त्याचप्रमाणे त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि समर्थ रामदास यांचेही नाव पुसण्यासाठी लढा उभारावा. संतमहंतांची जात काढण्याचे काहीच कारण नाही. तसे करणे चूकही आहे. पण फक्त ब्राह्मणवैरच ज्यांच्या नसानसांत भरले आहे, त्यांच्यासाठी हे काही चुकीचे ठरु नये. त्यामुळे ज्ञानेश्वर आणि रामदास यांचे नाव इतिहासातून, शालेय अभ्यासातून वगळावे, यासाठी पुढील आंदोनल असावे. कारण हे दोघेही ब्राह्मणच होते. तेव्हा आषाढी एकादशीला संत तुकोबारायांच्या पालखीबरोबर ज्ञानेश्वर महाजारांच्या पालखीऐवजी नामदेव, चोखामेळा किंवा तत्सम अब्राह्मण संतांची पालखी काढण्याची मागणी ब्रिगेडने करावी. श्री ज्ञानेश्वर तुकाराम ऐवजी श्री नामदेव तुकाराम असाही बदला त्यांना करता येईल.
छत्रपती शिवरायांचे कार्य आणि स्वराज्याचा भगवा ज्यांनी अटकेपार (पाकिस्तानमध्ये अटक नावाचे शहर आहे.) फडकाविला त्या राघोबादादांचे आणि समस्त पेशव्यांचे नामोनिषाण ब्रिगेडने मिटवून टाकावे. शनिवारवाडा पाडण्याचा कट काही बहुजन संस्थानी रचलेला आहेच. तशी आंदोलनेही होत असतात. त्यामुळे ब्राह्मण समाजालाच नव्हे तर समस्त हिंदुस्थानला अभिमानास्पद वाटणारा शनिवारवाडा जमीनदोस्त करुन तथाकथिक ब्राह्मणी वर्चस्वाला तडा देऊन टाकावा.
आणखी थोडे पुढे जाऊन झाशीच्या राणीच्या संघर्षाचा लढा इतिहासाच्या पुस्तकातून वगळण्यास सांगावे. झाशीच्या राणीचे माहेरचे आडनाव तांबे होते. तांबे म्हणजे ब्राह्मण. (कऱ्हाडे ब्राह्मण) महिला असूनही जिने पुरुषांना लाजवेल, असा संघर्ष केला त्या लढवय्या रणरागिणीचे नाव इतिहासात आहे कारण ब्राह्मण इतिहासकारांनीच तसे चित्र रंगविले आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई खरोखरच रणरागिणी होती की नाही, हे ब्रिगेडच्या इतिहासकारांनी शोधून काढले पाहिजे. झाशीच्या राणीचे नाव इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकले पाहिजे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकातील तिचा पुतळा आणि झाशी या गावी जर पुतळा असेल तर तिथूनही पुतळे काढून टाकले पाहिजेत.
संभाजी ब्रिगेडने थोडे त्याच्याही पुढे जायला हवे. पहिले क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील लढवय्ये मंगल पांडे आणि तात्या टोपे, तेल्यातांबोळ्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे लोकमान्य टिळक, सुधारणावादी विचारांचे गोपाळ गणेश आगरकर, तत्वशील विचारवंत महादेव गोविंद रानडे, क्रांतिकारकांचे मेरुमणी स्वातंत्र्यवीर विनायम दामोदर सावरकर, चापेकर बंधू, भगतसिंग आणि सुखदेव यांच्या जोडीने फासावर जाणारे राजगुरु, इंग्रजांशी मुकाबला करताना धारातीर्थी पडलेले रामप्रसाद बिस्मील आणि चंद्रशेखर आझाद, अनंत कान्हेरे, महात्मा गांधीजींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले, विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्शणात दैदीप्यमान कामगिरी करणारे महर्षि धोंडो केशव कर्वे, हिंदुस्थानचे राष्ट्रगीत लिहिणारे रवींद्रनाथ टागोर आणि वंदे मातरम् चे जनक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे इतिहासातील योगदान पुसून टाकले पाहिजे.
स्वातंत्र्योत्तर काळातील हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, केरळचे मार्क्सवादी नेते ईएमएस नंबुद्रीपाद, श्रीपाद अमृत डांगे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी प्रल्हाद केशव अत्रे आणि एस एम जोशी, भूदान चळवळ उभारणारे विनोबा भावे, सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे, इन्फोसिस या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती, पहिला हिंदुस्थानी अंतराळवीर राकेश शर्मा, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर, वेंकटराघवन, चंद्रशेखऱ, प्रसन्ना, व्हीव्हीएस लक्श्मण, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ आणि डॉन ब्रॅडमनलाही ज्याने वेड लावले तो सर्वांचा लाडका हिरो सचिन तेंडुलकर, जागतिक विजेतेपदाला वारंवार गवसणी घालणारा हिंदुस्थानचा अव्वल बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, हिंदुस्थानची गानकोकिळा लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी, माधुरी दीक्शित… ही यादी हजारो लाखोंपर्यंत वाढत जाईल. या सर्वांचे नामोनिषाण इतिहासाच्या पानापानातून मिटविण्याचे मोठे आव्हान संभाजी ब्रिगेडपुढे असणार आहे. कारण ही मंडळीही दुर्दैवाने ब्राह्मणच आहेत.
ही मंडळी आज त्यांच्या त्यांच्या क्शेत्रात अव्वलस्थानी आहेत. ती ब्राह्मण असल्यामुळेच त्या स्थानी आहेत किंवा ब्राह्मण म्हणून जन्माला आल्यामुळे त्यांना ते स्थान सहजासहजी मिळाले आहे, असे जो म्हणेल त्याला बावळटच म्हटले पाहिजे. ही मंडळी कष्ट, परिश्रम आणि अथक मेहनत घेऊन त्या-त्या स्थानी पोहोचली आहेत किंवा प्रसिद्धीच्या झोतात आली आहेत. फक्त ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना प्रत्येक ठिकाणी केकवॉक मिळालेला नाही किंवा कोणी मुद्दामून मदतही केलेली नाही. सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर वा परिश्रमांच्या जोरावर जर कोणी पुढे गेला असेल किंवा जात असेल, तर त्याची जात आडवी येत नाही. तसेच फक्त जातीच्या जोरावर कोणीही पुढे जाऊ शकत नाही, हे मान्य केलेच पाहिजे. किंवा तेच सत्य आहे. जे ही बाब मान्य करणार नाहीत, त्यांना भविष्य नाही हे मुद्दामून सांगण्याची गरज नाही.
सांगण्याचा मुद्दा असा की, काम केल्याशिवाय किंवा चमक दाखविल्याशिवाय फक्त ब्राह्मण आहे म्हणून कोणीही पुढे येत नाही, कोणालाही नाव मिळत नाही. जे शिकेल तो टिकेल, असे सध्याचे युग आहे. इतरांच्या दुर्दैवाने ब्राह्मण समाजाने शिक्शणाची कास सोडलेली नाही. त्यामुळे दादोजी कोंडदेवांपासून ते लतादीदींपर्यंत कोणत्याही ब्राह्मण व्यक्तीची कारकिर्द इतिहासातून पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला तरी त्यामुळे कोणालाही फरक पडणार नाही. ब्राह्मण समाजाला तर मुळीच नाही. आणखी पुढे जाऊन म्हणायचे झाले तर, इतिहासातून जरी नावे पुसली गेली ती समाजमनावरुन नक्कीच पुसता येणार नाही. म्हणूनच म्हणतो की, हिंदुस्थानच्या इतिहासात खारीचा वाटा उचललेल्या प्रत्येक ब्राह्मण व्यक्तीचे नाव पुसून टाकले पाहिजे. दादोजींपासून सुरुवात झाली आहे ती सचिन तेंडुलकरपर्यंत येऊन थांबावी, हीच अपेक्षा आहे.
हार्दिक शुभेच्छा…
हा लेख पत्रकार आशिष चांदोडकर यांनी लिहिला आहे.
जोपर्यंत समाजात जाती-पाती, धर्म अस्तित्वात राहतील, तोपर्यंत असे वाद होतच राहतील!
ya jati kon paltey? rajkarni. samanyala kahi ghene naste pun politicians na raj karayche sate. tyala ‘nuesance-value’ mhantat.to jewdha jasta jast tewhadi VALUE jast.
इतके दिवस जनता शिकलेली नसल्या मुले त्यांच्या अज्ञाना चा गैरफायदा घेत आपण त्यांच्यावर जुलूम केला. महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षण, बहुजनांना शिक्षण देणे सुरु केले तर त्यांच्या अंगावर विष्टा टाकली .आणि ज्ञानेश्वर , तुकाराम ,एकनाथ या संतांचा तुम्ही काय कमी छळ केला ? हे सर्व समाज जाणतो . करावे तसे भरावे म्हणतात. दादाजी आणि शिवाजीच्या माते बद्दल घाण विचार कोणी प्रसिद्ध केले? आता बाजी उलटली तर मगरीचे अश्रू ढाळतात. भगवान के घर दर है मगर अंधेर नही.
Phule hyan ni shikshan suru kela pan tyan na shiksha na sathi jaga koni dili he mahit aahe kay? topan ek brahman hota……
अहो ते भिडे…
संभाजी ब्रिगेड आणि त्यांना प्रोत्साहन देणारे सत्ताधारी राजकारणी, ह्यांना ब्राह्मणांविषयी किती चीड आहे हे दादोजी पुतळा कांडावरून अगदी शेंबड्या पोराच्याही लक्षात आले आहे.
त्यांचा मुजोरपणा आता अगदी उघडा पडला आहे.
सर्व ब्राह्मणांनी आता स्वजातीय थोर इतिहास पुरुषांचे पुतळे सार्वजनिक ठिकाणांवरून काढायची मोहीम हाती घ्यावी. ह्या थोर (ब्राह्मण) पुरुषांचे पुतळे आज न उद्या कुठल्या तरी ब्रिगेडच्या हातोद्याखाली जाणार हे निश्चित. त्यामुळे हे सर्व पुतळे ब्राह्मण संस्थांनी आपल्या ताब्यात घ्यावेत, आणि भविष्यातील संभाव्य अनादर टाळावा.
I would say this is highly biased article. if you live in pune you’ll find it quite difficult
previous comment was not complete when great dell’s track pad malfunctioned.. I am completely opposing the fact of removal of dadoji’s statue at the same time it is quite important to have a brahmin surname if you want to get a job in pune.. and thats the fact.. If Mone is HR then he will give job to only apte, bhide albeit halfwit.. this is personal experience.. being deshastha brahmin is not enough.. is this not discrimination??? some of my classmates ( I did not understand the context that time) used to spit a shivaji putala in kothrud.. name amit dandekar.. so surely these things are taught to him in house..boasting about knowledge and sharing it are 2 different things. fule was not a bramhin but he never kept knowledge with him and Maharshi karve always gave new dimension to womens education. When I recall it and context I feel enranged..Being proud of your caste is one thing.. boasting about it and telling everyone.. why only konkanastha people tell everyone that they are very intelligent is wrong.. just absurd.. think about it… and you will find these boasting twats everywhere in pune.. they live all their life in some peth with very limited outlook.. live and die in mediocre life boasting about their caste which is not a achievement..
Hatred grows hatred so start being impartial from yourself.
Few mahan people you missed are Dada Athavale of Swdhayay, Dr YG Joshi, Maharshi Karve and charu Apte, neurosurgeon
छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुती एकत्र आणून एक मराठा तयार केला.
शिवाजी महाराजांच्या याच तत्वाच्या विरोधात जाऊन जातीयतेची काळीमा फारणारे संभा बि-ग्रेडी हे महाराष्ट्र द्रोही बाजी घोरपडयाच्याच औलादी आहेत.
या संभा बि-ग्रेडींना दैवत श्री गणेश, परशुराम, संत ज्ञानेश्वारापासून अगदी माधूरी दिक्षीत नेणे व सचिन तेंडुलकर पर्यंत सर्वांची ईर्षा आहे.
हे बि-ग्रेडी पावनखिंड गाजवणार्या नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या नावेही शिव्या घालत होते. जेंव्हा त्यांना सांगितलं की बाजीप्रभु हे ब्राम्हण नसून प्रभु जातीचे होते तर अगदी थोबाडीत मारल्यासारखे गप्प बसले आणि आता पुन्हा बाजीप्रभुंचा उदो उदो करू लागले.
शिवरायांचे खरे मराठे हे शिवरायांचा पदोपदी अपमान होईल असे वागणार्या संभा बि-ग्रेडला धूळ चारल्या शिवाय राहणार नाही.
Agadee barobar……..
!
Ya mage keval RAJKARAN Ahe……….Tyamule Jaatiyavad phofavato ahe…..Apan jar he velich thambavale nahi tar Aplyavar punha Gulaamichee vel yeil………HINDUNNO EK WHA………….BHANDUN swatahachee shaktee nasht naka karu ……..
Yacha fayada Pardharmeeyanna (Cristians ani Muslims) yanna hoto……
PlzzzzzBE UNITED..!
Agadi Achuk Likhan Kela ahe Paristhithicha. B-Grade la ata apanach dhul charnar ahot ani tyabarobar Rashtravadi la dekhil. Ekach paryay mala samor disto, MaNaSe, Shri. Raaj Thakrey. 2014, yanchya haatat satta yavi hich iccha.
It is actually unusual for many of us when you find fantastic important information accessible online. free mobile texts and minutes
द्विजाची कैफियत
हल्ली मी दहशत वाद्यांच्या विरोधात बोलायचे टाळतो,
कारण बुरसटलेली विचारसरणी अशी हेटाळणी होईल
हल्ली मी आंदोलनात भाग घ्यायचे टाळतो,
कारण आंदोलनाचा पाठिंबा कमी होईल
हल्ली मी आरक्षणावर बोलायचे टाळतो,
कारण राजकारणी त्याचा फायदा घेतील
हल्ली मी समाजसुधारकांचे नाव ही घ्यायचे टाळतो,
कारण खोटा इतिहास सांगण्याचा खटला होईल
हल्ली मी टिळक, सावरकरांचे लिखाण वाचणे टाळतो,
कारण सनातनी विचारांचा शिक्का बसून जाईल
हल्ली मी सभ्य, सुसंस्कृत पणे बोलणे टाळतो,
कारण त्याला नपुंसकता समजले जाईल
हल्ली मी समाजसेवा करण्याचे टाळतो
कारण त्यातच आमच्या घरांची बरबादी, कुटुंबांची ससेहोलपट झाली
हल्ली मी आडनाव घ्यायचे टाळतो,
कारण त्यातून माझी जात ओळखली जाईल
हल्ली मी चारचौघात विचार मांडणे टाळतो,
कारण त्यात कुणालाही जातीय कावा दिसतो
हल्ली मी देशभक्तीच्या घोषणा देणे टाळतो,
कारण त्यात संघाचा प्रभाव दिसतो
नाही दादोजींना इमान, रामदासांना चारित्र्य,
शहिदांची जात येते वृत्तपत्रात मात्र
हळू बोला,आपल्या जातीचे नाव कुणी घेवू नका,
कृष्णाजीशिवाय कोणाचाही वारसदार स्वतःला मानू नका
आम्हाला शिव्या दिल्या शिवाय इतर मागासलेले ठरत नाहीत,
रात्री पुतळे हलवल्याशिवाय भ्रष्टाचारावरून जनतेचे चित्त हटत नाही
ही जात इतकी बदनाम कशी,प्रश्न मला पडला आहे,
जातीयतेच्या राजकारणात सारा देश सारा देश सडला आहे
जरी म्हटलं या साऱ्या अफवा खोट्या आहेत,
पण विषमता मिटली तरी आमच्या मनात मोठ्या दऱ्या आहेत
आमचा जप करून पोट काहींचे भरते यात आनंद आहे,
शेवटी त्यांच्या कडेही द्यायला शिव्या उरत नाहीत
आतातर यासाठी विशेष धर्म, संघटना निघाल्या आहेत,
भावी देशासाठी त्यांच्या आपापल्या घटना निघाल्या आहेत
त्यांच्या या घटनांमध्ये एका जातीला स्थान नाही,
म्हणून तिथे कवी कलशाला उल्लेखाचा ही मान नाही
काय करणार शेवटी ही जातच बदनाम आहे,
मान वर करून चालण्याची आमची काय बिशाद आहे
धर्म तोडणार्यांना, सत्ताधीशांना आगीत तेल ओतावे लागते,
त्यांच्या कडेही दुसरा फायद्याचा उपाय नाही
वाघ, सिंहाच्या वाटेला कुणी भक्त जातो काय,
यज्ञात बळी होतो बकरा, राजकारणात कोण होते पाहा,
धरली तर चावते, सोडली तर पळते अशी ही जात आहे,
ही तर कट्टरतेची माणुसकी वर मात आहे
स्वातंत्र्यानंतरही घरे जळाल्यावर आम्ही मागे हटलो आहोत,
समाजसेवा,परमार्थ करण्याला घाबरू लागलो आहोत
सोडा आता विचार सारे, पूर्वजांच्या चुका पुन्हा करू नका,
अहंगंडाच्या कोशात राहून वाट वाकडी धरू नका
जिभेवर असली सरस्वती तरी सत्य बोलावत नाही,
मानाने जगण्याचा हक्क ही आम्ही मागत नाही
आम्हाला आदर न दिल्याने समाज कुठे चालला आहे,
शिक्षणात पावित्र्य, समाजात नैतिकता, राजकारणात सौजन्याची ऐशी तैशी,
जीवनात रामापेक्षा दामाची जागा झाली मोठी
द्वेषाला द्वेषाने आम्ही उत्तर देत नाही,
द्वेषाचा धंदा करणार्यांचे दुकान बंद होत नाही
वोट बँक बनवल्याशिवाय प्रश्न कधी सुटणार नाहीत,
पैसा, सत्ता आल्याशिवाय समाजाला तुम्ही चांगले वाटणार नाहीत
शेंडी आणि जानव्याची ताकद अजून कमी झालेली नाही,
हार मानण्याइतकी परिस्थिती हाताबाहेर गेली नाही
सोडून सारे न्यूनगंड,हताशा, वर्तमानात जगूया,
गेली संकटे, झाल्या चुका, बदलण्याची वेळ आहे.
हिम्मतीने जगण्याचा हा काळ आहे.
उज्ज्वल भवितव्य घडवायचे आहे,
यश खेचून आणायचे आहे
होऊन गेला भूतकाळ, भविष्य बाकी आहे,
द्वेष कुणीही करो, राम आमच्या पाठीशी आहे
– कवी योगेश