in

भारतीय काँग्रेस स्वत:साठी भ्रष्टाचारी खड्डा तर खणीत नाही ना ?

हा लेख महाराष्ट्र माझा साठी मा.ना. बासरकर यांनी लिहुन पाठवला, आपणास हि महाराष्ट्र माझा साठी लेख लिहायचा असल्यास संपर्क साधा.

आज पर्यंतचे सर्वात भ्रष्ट सरकार?
आज पर्यंतचे सर्वात भ्रष्ट सरकार?

२जी च्या घोटाळ्यामुळे श्री. राजा यांना पायऊतार व्हावे लागले आणि त्यांच्या जागी श्री. कपिल सिब्बल यांना मनमोहन सिंग यांनी स्थानापन्न केले. श्री कपिल सिब्बल टेलिकॉम मिनिस्टर यांनी नुकतेच सी.ए.जी. च्या अहवाला बद्दल वक्तव्य केले त्या वरून असे दॄष्टिस येते कि काँग्रेस मधला आत्मविश्वास ढासळत आहे. त्यांच्या सरकारवरच्या भ्रष्टाचारच्या  आरोपानां सामोरे जाण्याचे सोडून घोटाळा उघडकीस आणलेल्या सी.ए.जी. यांच्या अहवालावर टिप्पणी करणे म्हणजे जनते मधील  असंतोष निवळण्यासाठी केलेला एक केविलवाणा प्रयत्न आहे.
खरे तर असे वक्तव्य केल्यामुळे मनमोहनसिंग सरकारचे काम अजून कठीण होत आहे. ऑडिटर जनरलच्या अहवाला नुसार ३९०० करोडचा तोटा २जी च्या सौद्यातून झाला, पण कपिल यांच्या म्हण्यानुसार सी.ए.जी. ने मुळ तोटा वाढवून अहवालात नोंदी केल्या आहेत. पी. ए.सी. (Public Account Committee ) श्री. सिब्बल यांच्या या वक्तव्याची गंभीर पणे दखल घेऊन कपिल सिब्बल यांच्या विरुद्ध ” Breach  Of  Privilage Motion ‘ पार्लीमेंट मध्ये आणण्याच्या विचारात आहेत.

कपिल सिब्बल यांनी जें भाष्य केले ते काहीं त्यांच्या स्वत:चे नाही हे निश्चित. त्यांचा बोलिवता धनी कोणी तरी वरचा आहे. हा जो प्रयत्न चालला आहे तो श्री. राजा यांना वाचवण्यासाठी नाही तर मित्रपक्ष DMK ला भ्रष्टाचाराच्या आरोपातून सुटण्यासाठी व त्या योगे आपले सरकार टिकविण्यासाठीची चाललेली केविलवाणी धडपड आहे.

श्री. मनमोहन सिंग यांनी सभाग्रहात कबुल केले कि ते स्वतहा पी.ए.सी. (P.A.C ) समोर सर्व आरोपांचे उत्तर देतील , पण सिब्बल यांच्या वक्तव्या वरून असे वाटते कि काँग्रेस पार्टी सी. ए. जी. चा अहवाल व त्यातील दाखवलेल्या चुकांकडे गांभिर्याने न बघता नुसते आरोप कोणा तरी  दुसर्याच्या माथी मारीत आहेत. सी.ए.जी. चा रिपोर्टच चुकीचा आहे असे म्हणणे योग्य नाही. अश्या प्रकारच्या अयोग्य हालचाली मुळे शेवटी हें सर्व काँग्रेस च्या अंगलट येईल अशी चिंन्हे दिसत आहेत.

नुकतेच श्री. सिद्धार्थ वरदराजन नि  “The  Hindu ”  मध्ये अशाच प्रकारची काँग्रेस बद्दल भीती व्यक्त केली. “If  the UPA Govt . continues to remain in denial , it  will pay a heavy political price.”

आता जवळ जवळ एक वर्ष होत आहे व नवं वर्ष पण आलं तरी भ्रष्टाचाराच्या बातम्यांनी रोज रखानेच्या रखाने वर्तमान पत्रांत भरले जात आहेत.  पुढे येणार्या बजेट सेशन मध्ये विरोधी पार्टी ह्या  विषयावर बराच गोंधळ घालणार व जाब विचारणार तेव्हां यु.पी.ये. सरकार अडचणीत येणार.

श्री मनमोहन सिंगनी देलेल्या आश्वासना  प्रमाणे भ्रष्टाचाराचे मुळ शोधून त्या वर उपाय योजना करावी अन्यथा पुढच्या वेळी सरकार येणे कठीणच जाईल. जर का असेच कोणी ना कोणी त्यांच्या पक्षातील नेते मंडळी उलट सुलट विधाने करतच राहिली व त्यास पायबंद घातला नाही तर ज्वलंत आगीत तेल ओतल्या सारखे होईल. आग विझविण्यासाठी  केलेल्या  उपाय योजना मुळे आग अधिकच भडकेल असे होऊ नये म्हणजे झाले.

मा.ना. बासरकर
“देवाण-घेवाण” http://mnbasarkar.blogspot.com

आपल्याला काय वाटते? भारतीय काँग्रेस स्वत:साठी भ्रष्टाचारी खड्डा खणीत आहे का?

Written by Ashish

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I Love You Dear... But

लव्ह लेटर.. असेहि

Hindu

हिंदू मना बन दगड