in

राजे पुन्हा जन्मास या..

आपल्या महाराष्ट्र माझा चे नियमित वाचक स्वप्निल देमापुरे (वय २२) यांनी खास महाराष्ट्र माझाच्या वाचकांसाठी शिवजयंती निमित्त लिहिलेली कविता..आपणा साठी.

जन्म घ्या तुम्ही जन्म घ्या

राजे पुन्हा जन्मास या

शिरि शिरपेच हाती समशेर शोभती

अश्वरुढ होई राजा शिवछत्रपती

हे राजे, तुम्हा हिन्दुह्रुदय पुकारती

भगवा धरुन हातात या..राजे पुन्हा जन्मास या. || १ ||

कावा गनिमी करुनी, धर्मरक्षिण्यास

फाडिले अफजल खानास तसा

आज सरकार म्हणे त्यास फासी नको.

फाडण्या पुन्हा खानास या

राजे पुन्हा जन्मास या. || २ ||

नाव घेती तुमचे किती, परी

चरित्र कुणा का ना उलगडे तरी?

राजकारण करी, ती नावावरी,

शिकवण्या धडे राजकारणाचे या

राजे पुन्हा जन्मास या. || ३ ||

पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माणास या

मराठि अस्मिता जागविण्यास या

नको बांधणि किल्ल्याची आम्हा आता

माणुस मराठि एकदा जोडण्यास या

राजे पुन्हा जन्मास या. || ४ ||

जाणत्या राजास ला़ख्-लाख मुजरा असो

स्विकारण्या माझ्या मुजर्यास या

राजे पुन्हा जन्मास या.

जन्म घ्या तुम्हि जन्म घ्या

राजे पुन्हा जन्मास या. || ५ ||

स्वप्निल देमापुरे, यवतमा़ळ

Written by Ashish

13 Comments

Leave a Reply
  1. प्रिय स्वप्निल,तुझी कविता आणि त्या मागचा विषय अतिशय स्वगातास्पद आहे. आता राजे पुन्हा जन्माला येणार नाहीत. आता मराठी समाजाची धुरा तुमच्या तरुण मंडळीच्या हातात आहे. महाराष्ट्र हया शब्दाचा अर्थ तुम्ही तरुण मंडळीनी नीट समजावून घेण्याची गरज आहे. महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. हे शिवाजी राजानी स्थापन केले. आणि पुन्हा भविष्यात महाराष्ट्र देश स्थापन करावा लागेल. उत्तर प्रदेश आणि बिहारचे लोक महाराष्ट्रामध्ये नव्हते तेंव्हा मराठी माणूस उपाशी मरत न्हवता. महाराष्ट्र आपले महत्व मुम्बई लगत असलेल्या बंदराच्या अस्तित्वाने वाढतच राहणार. महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणाच्याही मदतीची अजिबात गरज नाही.शिवासेनेने संजय निरुपम ला आपल्या पक्षामध्ये घेउन पहिली चुक केली. राज ठाकरे आणि नारायण राणे ह्यांना पक्षाबाहेर काढून सर्वात मोठी चुक केली. बालासाहेब ठाकरे ह्यांचे आता फार थोड़े दिवस राहिले आहेत तेंव्हा त्यांनी शेवटच्या कालावधि मध्ये अशा महाचुका करू नयेत असे मला वाटते. हया चुका पुढे मराठी माणसाला फार महाग पडतील. आज राज ठाकरे ह्यांनी जे काही केले त्याचे मी समर्थनच करतो. नारायण राणे ह्यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पठिम्बा द्यावा आणि मराठी माणसाची किंमत सुधारून घ्यावी. मराठी माणसाचा दरारा कमी होऊ नये ही अपेक्षा.जय महाराष्ट्रएक स्वाभिमानी मराठी सुनील यादव, विमान नगर, पुणे ४११०१४

  2. स्वप्निल,तुझी कविता आणि त्या मागचा विषय अतिशय स्वगातास्पद आहे
    जय महाराष्ट्र एक स्वाभिमानी मराठी

  3. pahile tar jai Maharashtra. 
    Vachun mazya angavarache kate ubhe rahile 
    Kharach ‘MALA ABHIMAN AHE MI MAHARASHTRAIYA ASALYACHA’

  4. Thanx For making such a inspiration poem……..
    Kavita vachun aajchya Kalat Raje aste tar kay kay ghadale aste yacha vichar karyala bhag padle…..

  5. Saheb punha janmala ya………

    Khup Chan Kavita AAHE…

    THANKS Swapnil….

Leave a Reply to ganesh pavale Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तलवार तिरडी आणि वळु.

अरे काहि तरि लिहि कि.. .