सुहास शिरवळकर.. माझा आवडता लेखक.
पुस्तके मि अनेक वाचली आहेत पण ज्या पुस्तकां मध्ये मला माझ्या आजुवाजुचे विश्व आहे तसे दिसले ती होती फ़क्त सुशिंचीच. एकदा पुस्तक हातात घेतले की ते संपुर्ण संपेपर्य़ंत खालिच ठेवु शकत नाहि अशी हि लिखाणाची अफ़लातुन शैली. वाचनालयातुन पुस्तक आणायचे आहे ना… फ़क्त एकच अट “लेखक सुहास शिरवळकर पाहिजेत” बास.. आणि काहि नको. त्याच सुहास शिरवळकरांच्या पुस्तकातील काहि मजकुर इथे देत आहे.. आशा आहे तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या कडे काहि ओळी असतील तर त्या कमेंट्स मध्ये टाका..
_____________________________________________________
हे…हेच बदल म्हणजे जीवन असेल तर कशाकरता
जगायचं ते? पतंग आपला फाटतोय…गोते खातोय…त्याला खाली
हापसायचा.ठिगळं लावून पुन्हा उडवायचा. मध्येच मांजा तुटला की
सारी पोरं पतंग धरायला ‘है॓sss’ करुन धावतात.जिवाच्या
आकांतानं आपणही त्यांच्या बरोबर दमबाजी करीत पळायचं.
‘एssसो ss ड…सोड!भैं…द!हात तोडून टाकीन!’ म्हणत पतंग
पुन्हा पकडायचा. गरम छातीनं, पेटके आलेल्या पोटयांनी
परत जागेवर यायचं-तुटलेल्या मांज्याला पक्क्या गाठी
मारायच्या…
पुन्हा पतंग आपला आकाशात!
का रे बाबा एवढा सोस?
तर फाटका,ठिगळं लावलेला…कसाही का
असेना…आमचा पतंगही आकाशात उडतो आहे!…देख!
तिच्यायला! त्यापेक्षा ठिगळांसकट, गाठींच्या मांज्या-
सकट, त्या पतंगाची जाळून राख करुन, द्या चिमूट-चिमूट
सगळ्या धावणायांच्या हातात !…खा प्रसाद म्हणून. नाही तर,
लावा कपाळाला अन् नाचा…आकाशात फडफडायला
दुसया एखाद्या डौलदार पतंगाला जागा झाली म्हणून!…
…’दुनियादारी’
_______________________________________________
…’असीम’
‘वर्षा–‘
‘आवाज चढवू नकोस कौस्तुभ, हे तुझं किंवा माझं घर
नाही–रस्ता आहे!तुला आठवतं-त्या दिवशी मी
तुला जाणीवपूर्वक प्रश्न विचारला होता,की कौस्तुभ
या भूमिकेसाठी इत्क्या कसलेल्या नट्या तुझ्या ओळखीत
पडलेल्या असताना तू माझी क निवड केलीस? तर तू
उत्तर दिलं होतंस-तू हे सगळं खरं मानणार नाहीस,
म्हणून!तुझी खरोखरची पत्नी व्हायची इच्छा
होती माझी;तुला मी काही तासांसाठी– कोणाची
तरी फसवणूक करण्यासाठी पत्नी म्हणून हवी होते!
तुझ्या नावानं गळ्यांत मंगळ्सूत्र घालावं,एवढंच
महत्त्वाचं स्वप्न होतं माझं. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं
तुझ्याबरोबर सात जन्म संसार करायला मी वचनबद्ध
व्हायला तयार असताना तू मला खोटं मंगळ्सूत्र
घालशील का म्हणून विचारत होतास!’
बोलताना तिचा गळा दाटून आला. डोळे
भरून आले.
_____________________________________________
…’सॉरी , सर…!’
‘चिअर्स-!’
तिनं ग्लास ओठाला लावला.वास घेऊन पुन्हा बाजूला केला.
त्याच्या आशा ठिसूळल्या.
‘का, काय झालं?’
‘डो’न्ट वरी.मी हा ग्लास संपवणार आहे मिस्टर टंडन.’ ती
गंभीरपणे म्हणाली,’कारण,तुम्ही मला इथे कशाकरता
बोलावलंय् याची मला पूर्ण कल्पना आहे!जे घडेल, ते
बेहोशीत घडून जावं…शुद्धीवर आल्यावर त्याची जाणीवही
राहू नये, म्हणून तरी मला हा ग्लास संपवलाच पाहिजे.पण
शुद्धीत असताना मी काय सांगते ऐकून ठेवा.माझ्या
किरणला आज नोकरीची गरज नसती तर…थोड्या वेळानं
जो देह तुम्ही विवस्त्र पाहणार आहात मनसोक्त उपभोगणार
आहात…त्या देहाचं नखसुद्धा तुमच्या दृष्टीस पडलं नसतं!
पण माझ्या दुर्दैवानं,दान तुमच्या बाजूचं आहे.त्याला
नोकरीची नितान्त आवश्यकता आहे. म्हणूनच आजच्या
रात्रीपुरता हा देह तुमच्या स्वाधीन करणार आहे!’
असं म्हणून तिनं ग्लास तोंडाला लावला.गटागट पिऊन
टाकला
तो आवाक्!त्याच्या हातातला ग्लास तसाच.
‘घ्या मिस्टर… घ्या !अपराधाची बोचणी लागून म
जा
किरकिरा होणार नाही म्हणजे!’
त्यानं निमूटपणे ग्लास उचलला.संपवला.
______________________________________________
…’न्याय-अन्याय’तपासाची सूत्रं अशोक फडकरच्या हाती जायला नको होती!डिपार्टमेंटचा
हा एक माणूस टेरर आहे. नसलेलं सूत निर्माण करून,त्या वरुन स्वर्ग
गाठण्यात त्याचा हात कोण धरणार नाही!
आणि पोलिस आहे का कोण हो! साला औषधाला पैसा खाईल तर शपथ!
-हे फार वाईट!
म्हणजे, हा या ना त्या प्रकारे योग्य मार्गाने माझ्यापर्यंत पोहोचला,तर…!
दिवाभीतीचं आयुष्य-या शब्दाचा अर्थ मला तेव्हा खर्या अर्थाने कळला!
दारावरची बेल वाजली की,माझे हात-पाय गळायचे!कामाच्या ठिकाणी कोणी
हाक मारली की,खपकन् हृदय बंद पडायचं!
माझं नशीबच थोर,म्हणून या काळात माझी न् फडकरची कुठे समोरासमोर
गाठ पडली नाही!
तरंगिणी गेली…ऐन तारुण्यात गेली….अशा प्रकारे गेली…तिच्या मृत्यूला
आपणच जबाबदार आहोत.
सगळं मला मान्य होतं.झाल्या प्रकाराबद्दल मला दु:ख वाटत होतं.मन:पूर्वक
पश्चातापही होत होता.
पण असा विचार करा-मी काही कोणी सराईत खूनी नाही.सायकिक तर त्याहून नाही.
किंबहुना,गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल मला स्वत:लाच चीड आहे.मग,मी न सापडल्याने,एक
मोठा गुन्हेगार मोकला रहातो,अशातला भाग नाही,हे तुम्हीही मान्य कराल.कसं घडलं
ते मी तुम्हाला हातचं काहीही न राखता सांगितलंच आहे.
तरंगिणी तर गेली.आता,मी माझे प्राण वाचवायला प्रयत्न केला तर,त्यात चूक
काय आहे?
हा मुद्दा लक्षात येताच, माझं डोकं विचार करायला लागलं.
फडकर कसा तपास करतो-त्याला काय मिळतं…नुसतं पाहात बसून चालणार नाहीये!
पुराव्याअभावी पोलिसांनी केस फाईल केली तरी डोक्यावर आयुष्यभर टांगती तलवार राहिल!
त्यापेक्षा,आपणच फडकरला आपल्या दृष्टीनं सुरक्षित अशी शोधाची दिशा दिली पाहिजे.
खटला निकाली झाला पाहिजे!
दोन दिवस मी त्याच विचारात होतो.आणि तिसर्या दिवशी माझ्या विचारांना दिशा
मिळाली.
तो-एल्.आय्.सी.डेव्हलपमेंट ऑफिसर!
काही इलाज नाही! तो या प्रकरणा संदर्भात तरी इनोसन्ट आहे,हे मला माहित आहे.
पण,माझी मान निश्चित्पणे वाचवायची असेल तर,त्याची पक्की अडकणं आवश्यक आहे!
निर्णय घेताना मला वाईट वाटलं खरं;पण शेवटी…
न्याय-अन्याय…सगळ्या टर्मस् सापेक्षच की!
__________________________________________________
दुनीयादारी
तुझं प्रेम हे आकाशाइतकंच खरं नि सर्वव्यापी आहे रीन जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी आपण आकाशाच अस्तीत्व नकारु शकत नाही पण रीन, म्हणुन कोणी आकाशाखालीच निवारा शोधत नाही! त्यासाठी घराच्या अस्तित्वाची गरजही तितकीच प्रखर असते! तु माझ आकाश आहेस श्रध्दा माझा निवारा आहे! मी तुझं आकाश आहे; धीरुभाई तुझा निवारा आहे आकाशानं आकाशाइतकचं भव्य राहावं रीन त्यानं कोणाच्या निवाऱ्याचं छप्पर हो उ नये!
__________________________________________________
‘क्षितिज’
माफ करा विश्वासदा!तुम्ही दिलेलं हे बक्षीस मी आजपर्यंत अभिमानाने जपलं
कसेही प्रसंग आले तरी ते काधून टाकण्याचा विचारही माझ्या मनात डोकावला नाही.पण…
आज मी ही सिगारेट-केस लायटरसह विकू इच्छितो!
सारं जग-विश्वाचे सारे मानवी व्यवहार भाकरीच्या एका चतकोरात सामावतात,हे
आज मला पटलं.तुम्हाला पटलं तर तुम्हीही मला माफ कराल!
तुम्ही उत्स्फूर्तपणे दिलेली ही छोटीशी भेट विश्वासदा,या भेटीच्या
रुपानं एकदा सारं विश्व मुठीत बंदिस्त झालं होतं.सारी इन्डस्ट्री तेव्हा पायाशी असल्यासारखं
वाटलं होतं.भविष्याच्या स्वच्छ निळ्याभोर आकाशात एक सप्तरंगी क्षितिज-रेषा दृष्टीपथात
आली होती.पौर्निमेचा उगवता चंद्र असा$ हात लांब करुन हातात घेण्याइतका सहजप्राप्य
वाटावा,तशी ही क्षितिज-रेषा चार पावलांवर भासत होती.या रंगीत क्षितिजावर एक
दिमाखदार,टप्
पोरा तारा स्वयंतेजाने तळपत होता.कीर्ती…पैसा…मानसन्मान…असे त्याचे
कितीतरी पैलू नजरेच्या टप्प्यात होते.वाटलं होतं, या क्षितिज-रेषेपाशी लवकरच आपल्याला
पोचायचं आहे.मग तो उगवता तारा हळूच स्वत:हून खुडला जाईल.आपल्या माथ्यावर विराजमान होईल.
आता मला कळलं आहे विश्वासदा;
तुम्हाला कळलं आहे का?
कोणत्याही अतृप्त कलावंताची अधाशी नजर अशाच एका क्षितिज-रेषेवर खिळलेली अस्ते.
या रेषेवर एक तारा अस्तो.
या तार्याचं प्रतिनिधीक रूप म्हणजेच कलेतला आपला आदर्श.
या आदर्शांपर्यंत पोहोचणं,हेच आपल्या कला-जीवनाचं ध्येय.सांगता.
हा तारा हासिल करण्यासाठीच कलाकार तन-मन-प्राण पणाला लावून आयुष्यभर
झिजतो,कष्ट घेतो.पावलाला शेकडों जन्मांची तपश्चर्या करीत या क्षितिज-रेषेकडे सरकत राहातो.
आणि…
क्षितिज हाती लागत नाही;
तार्याची जागा सापडते,तर ताराही पुढे सरकलेला!
किती चमत्कारीक आहे हे विश्वासदा!
या तार्याची नजरही दूर कुठेतरी स्थिरावलेली असते.त्याच्या नजरेसमोरही,
त्याच्यापुरती दिसणारी अशी एक क्षितिज-रेषा असते.तिथेही एक दैदिप्यमान तारा लखलखत
असतो.आणि ती जागा मिळत नाही म्हणून आपला तारा असमाधानी असतो.दु:खी असतो.
कष्टी असतो.उदास असतो.
प्रत्येक कलाकाराचं क्षितिज असं त्याच्या दृष्टीपथात;
हाती मात्र येत नाही!
____________________________________________________
’स्वीकृत’
’का गं झोप नाही लागत का?’
प्रश्न उत्तर देण्यासाठी नव्हताच. नि:शब्दपणे ती त्याच्या शेजारी येऊन बसली. सिगारेटचा देखणेपणा ऐटीत जळत तिचं पार थोटूक होईपर्यंत ती पहात राहिली. मग त्यानं ते थोटूक रस्त्यावर उडवलं.रस्त्याच्या मध्यावर पडून ते रागावल्यासारखं भकभकत राहिलं. धुराची एक अशक्त रेषा सरसरत राहिली.
हेच माणसाचं जीवन. आयुष्यभर असं जळत राह्यचं…नाहीतर विझून राख होऊन जायचं! मागे सिलकीत काहीच नाही शेवटी!
मी कोण, कोठुनि, कशास्तव येथ आलो?
ही इंद्रिये धरुनि सज्ज कशास झालो?
कर्तव्य काय मज येथ करावयाचे?
-मेल्यावरी तरि कुठे, मज जावयाचे?
…कोण?
कशासच उत्तर नाही आपल्यापाशी. अगदी प्राथमिकसुद्धा!
एका स्त्रीच्या आणि वासनेतून…त्यांच्या कामक्रिडेचं फळ म्हणून…त्यांची इच्छा म्हणून जन्माला आलो. कोणाच्या न कोणाच्या आधारे जळत…जाळत मोठा झालो.का? कशाकरता?
…डोन्ट’ट नो!
एका स्त्रीला य:कश्चित गर्भ देऊ शकत नाही आपण… या प्रश्नांच्या अंतापर्यंत काय पोहोचणार?
____________________________________________________
सूत्रबद्ध्
एकदा सम्बध येन्यापूर्वी,तो येऊ न देण माणसाच्या हातात असत. एकदा सम्बध आला की,’आपण एकमेकांची ओळख विसरुन जाऊ! हेही चालत नाही! एकदा माणूस कळला की आपल्या किंवा त्याच्या अंतापर्यंत तो असतोच!
____________________________________________________
’काळंबेरं’
आत…आत,जंगल-गाभ्यात खोल…खोल शिरत…
अखेर मी त्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो होतो!
वृक्षतोड करुन,सोयीनं तयार करुन घेतलेलं मैदान.त्यात,आपली कबर कोणती,ते मृतालाही आता ठामपणे सांगता येणार नाही,इतक्या त्या मेलेल्या…पडझड झालेल्या…रंगावर धुळीचे लोट बसलेल्या…स्वत:ची ओळख हरवून बसलेल्या कबरी…
आणि,एक चबुतरा!तो मात्र तुकतुकीत,स्वच्छ!
कबरी तशा फारशा नव्हत्या.’किती आहेत?’असं मनाशी विचारत,मी पुढे येताना त्या मोजूनही टाकल्या!
एक…दोन…ती चौथी…सहा…सात…दहा!
दहा!
हा आकडा कबरींच्या संदर्भात मला परिचयाचा वाटला.जणू,कबरी म्हटलं की,त्या एका जागी दह-दहाच्या बंचमधेच असणार!
मग,अगदी अचानकपणे,या ’दहा’चा संदर्भ लागला;आणि मी नखशिखान्त शहारलो.
दहा!अली-बंधू अकराजण होते.पैकी,सादिक एकटा जिवंत आहे!
दहा भावांच्या दहा कबरी!
आणि… हा चबुतरा राखीव-अकराव्या कबरीसाठी?
या क्षणी तो संपूर्ण रिकामा होता;पण चबुतर्या
आणखी एक जबरदस्त सु.शि. फॅन की काय? बरं वाटलं भेटून!
zoom madhil kahi milale tar pls pathva
All novels are excellent!! Dara Buland is my favorite character created by Su. Shi. Aflatoon lekhak!!
dunyadari hrudyasparshi dastan mukati hya asya anek kadambarya aset tyat lihinyasarkhe kup ahe tumi tyachi nond ka keli nahi mi swata lihile aste pan mi out of country ahe v ite novels milat nahit manun pls check kara v je avadatil ti add kara. like “ayusyhat sarvana sarv milate pan te yogyaveli milat nahi hey ch durbhagyare………” dunyadari dastan navch kup ahe patrache “rasik kalavant” ase barech kahi ahe hey maze collection ahe Sorry mi jast lihu sakat nahi
Mi Sudha Su. Shi. Yancha Chotasa Wachak ahe. Mi Su. Shi. nchi “Mantrajagar” , “Jhoom” Ankhi Baryachashya Kadambarya Wachlyat . Mi Tyanchi Wachleli Pratham Kadambri “Praktan”. Ti Wachalyapasan te majhe awadate lekhak ahet …..ahet majhya Vrudyat, manat……..Kholwar Dadun baslet Nehamisathi……….Tyanna V Tyanhya Lekhanila SALAAM
Shatrughna
i like it
ayushyat sampurna chukich asa kahich nasat……….. band padalela ghadyal sudha divsatun donad barobar asta.
Duniyadari hi mazi 1 aavadti novel aahe… atishay hrudaysparshi aani vastavik kadambari aahe..mi barachvela libreary tun gevun vacahi.. pan man kahi ekena tevha swath vikat ghetali aahe… Duniyadari partekachya aaushavar aadharit aahe… thanx for a wonderful writting
Where can I get ‘Kalber” ,Which prakashan.
Kalber Kadambari Kunakade Milel ka?
Please give me link related to hrudaysparshi…….
Please do the needful.
As ur all duniyadari liked alot.
Me khup shodhatey he book so please send me link or do tell me where will i get this book.
please send me link or book stall name wr will get hrudaysparsh..plz
do the needful.
सुहास शिरवळकरां सारखा दूसरा लेखक पुन्हा होणे नाही . परंतु आमच्या झापडबाज समिक्षकांनी त्यांना नेहमीच डावलले . वाचकांचे ते आवडते लेखक होते . दारा बुलंद , मंदार , फिरोज इराणी , बॕ. अमर विश्वास ही त्यांची पाञे खूप लोकप्रिय होती . गढूळ , मुक्ती , समथिंग , दुनियादारी ही सगळी पुस्तके अप्रतिम आहेत .