in

बाळ केशव ठाकरे

हिंन्दुत्वाचा टणत्कार. व्यंगचित्रकार ते हिन्दुह्रुदयसम्राट

तोंड वाजवुन न्याय मिळत नसेल तर
तोंडात वाजवुन न्याय मिळवा,
पण न्याय हा झालाच पाहिजे.

बाळ ठाकरे

एक माणुस तुमच्या माझ्या सारखाच, उंचीने आणि वजनाने मात्र कमीच. पाहत होता आपल्या आजुबाजुची परिस्थिती. होणारा मराठी माणसावरचा अन्याय, तोहि महाराष्ट्रातच. मूग गिळुन गप्प बसलेले सरकार. ती चारी बाजुने होणारी गळचेपी. आता काय करावे..आपण हि गप्प बसावे कि आवाज उचलावा. तो माणुस सामान्य नव्हता त्याने शांत बसणे हा विचार कधीच केला नाहि आणि फ़ुंकली तुतारि मराठि अस्मितेसाठी कारण तो होता बाळ ठाकरे. बाळने आपला तोफ़खाना उघडला. बघता बघता मावळे जमु लागले, ताकद वाढु लागली. पण नक्कि करु काय हा प्रश्न होताच. इथेच वडिलांनी प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..

“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रुप देणार कि नाही? काहि नाव सुचतय का संघटने साठी?”

बाळ उत्तरला..”विचार तर चालु आहे..पण संघटनेला नाव…”

मि सांगतो नाव…..शिवसेना

१९ जुन १९६६..शिवाजी पार्क..हजारोंनि जमलेला मराठी माणुस. आणि स्थापन झाली शिवसेना. गर्दी आणि ठाकरे हे इथे जुळलेले गणित आजतागायक फ़िसकटलेले नाहिये. नव्वदिचा काळ, राष्ट्रिय नेत्यांनी यात्रा आयोजित केल्या होत्या. हिन्दुत्वाचा आवाज बुलंद होत होता. एकच लक्ष्य “राम मंदिर”. शिवसेनेनेहि हिंदूत्वाचा अंगार हातात घेतलेला. शेवटि ते झालेच. बाबरी मस्जिद आडवी केली गेली. त्या नंतर उसळला तो एकच दंगा. मि मि म्हणणारे आणि स्वतःला हिंदूचे नेते म्हणवुन घेणार्यांचे हि परिस्थिती बघुन धाबे दणाणले. त्यानी सरळसोट जवाबदारी नाकारली. यात आम्हि नव्हतो. यात आमचा एकही माणुस नव्हता असतील तर ते असतील “शिवसैनिक“. त्या वेळि बाळासाहेबांना विचारले गेले..

“काय हे तुमचे शिवसैनिक होते?” या वेळि बाळासाहेब सहज म्हणुन गेले असते कि हे आमचे कोणच नव्हेत… पण छे.. शिवसैनिकांना एकटे टाकुन देणारा हा नेताच नव्हे. त्याने संपुर्णपणे शिवसैनिकांची साथ दिली. आणि इथेच या नेत्यानी सांगीतले..
हे बाबरी पाडणारे जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे.” (हे असे ’स्टेटमेंट्’ द्यायचे धाडस कोण्या नेत्यात असेल?)
हा हिन्दुत्वाचा अंगार भल्याभल्यांना पेलवला नाही अपवाद केवळ एकच.. बाळासाहेब ठाकरे.

मुंबईत दंगल उसळलि होती ९३ साली. त्या वेळि केवळ आणि केवळ शिवसैनिकांमुळेच मुंबई वाचली होती. सगळी बाळासाहेंची कडवट शिस्त, बुलंद हिन्दुत्वाचा बुलंद आवाज शिवसेना. जे कोणताही नेता जाहिर पणे बोलणार नाहि तेच हा नेता अगदी सहज पणे बोलुन जातो. कारण एकच ’आहे खरे तर का बोलु नये?’ आणि विचार एकल्यावर कोणीही म्हणेल..अगदि माझ्या मनातले बोलला. काहि सरकारि कामे होत नाहित नुसत्या फ़ाईली गोळा होतात..काम कोण करणार? कामं का होत नाहित? या वेळि या नेत्याने सांगितले अरे या फ़ायली नुसत्या गोळा करुन काय ठेवताय मंत्रालयात. जर या फ़ायली मंत्रालयात नुसत्या पडुन राहणार असतील तर आग लावीन मंत्रालयाला. भुकंप झाला होता भुकंप या ’स्टेटमेंट’वर.

पाकिस्तानच्या आतंकवादि कारवाया खुपच वाढल्या होत्या. नुसती घुसखोरी होत होती. आणि या सरकारचे काय चालु होते तर पाकिस्तानच्या टिम ला क्रिकेट खेळायला बोलवायचे, बाळासाहेबांचा रोखठोक सवाल..अरे या देशाच्या एवढ्या आतंकवादि कारवाया वाढल्या असताना कसल्या क्रिकेट खेळण्याच्या बाता करता? हे होता कामा नये. आणि बाळासाहेबांनी एकदाच सांगीतले

मी मुंबईत पाकिस्तानच्या टिमला खेळुन देणार नाहि.”

त्या वेळे पासुन ते आजच्या दिवसापर्यंत पाकिस्तान टिमने मुंबईत पाऊल ठेवलेले नाहि, अरे धाडसच नाहि, कोण या अंगाराशी खेळणार?

या बाळासाहेबांनि अनेक पिढ्या पाहिल्या घडवल्या, शिवसैनिक घडवले. हे शिवसैनिक बाळासाहेबांसाठि जिव हि द्यायला तयार. केवळ बाळासाहेबांचा आदेश आहे म्हणुन आपल्या जिवाची फ़िकीर न करता अनेक शिवसैनिकांनी आपले रक्त सांडले आहे. हे केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या प्रेमापोटि. जिवाला जिव देणारि लाखो माणसे.
“केवळ एक आदेश द्या साहेब जिवाचीही पर्वा करणार नाहि” हा शब्द आहे शिवसैनिकाचा.

बाळासाहेब एक असं व्यक्तिमत्व कि ज्याची ओळख करुन देण्याची गरज नाहि. अख्खे महाराष्ट्र त्यांना साहेब या नावानी ओळखतो. एकटा माणुस, एक ज्वलंत विचार मनाशी, अंगार मुखाशी घेऊन एक संघटना बनवतो “शिवसेना”. आज शिवसेनाचा विचार केल्या शिवाय एक हि राजकिय निर्णय घेतला जात नाहि एवढि प्रचंड ताकत. एकट्या माणसाच्या आवाजाने उभा पेटलेला महाराष्ट्र शांत होऊ शकतो तर शांत महाराष्ट्र पेटु शकतो. एक माणुस पुर्ण शिवाजी पार्क-“शिवतिर्थ” खचाखच भरवुच कसे शकतो, तेहि अनेक वर्षे सलग हे अजुन न सुटलेले कोडेच. म्हणुनच बाळासाहेब ठाकरे हे नुसते व्यक्तिमत्व नसुन एक चमत्कार आहेत.

मराठि अस्मितेची आग ज्याने महाराष्ट्रातल्या मराठि माणसात धगधगत ठेवली अश्या व्यक्तिमत्वास माझे प्रणाम, त्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र घडवायचा प्रयत्न करुया.

जय महाराष्ट्र.

आशिष कुलकर्णी

 

31 Comments

Leave a Reply
  1. साहेब आपण जे काही लिहिले आहे बाळासाहेबांबद्द्ल व शिवसेनेबद्द्ल एकदम दुरुस्त आहे. साहेबांच्यासारखेच आपले एका शिवसैनिकाचे लिखाण एकदम रोखठोक आहे. साहेबांच्याबद्द्ल सर्व माहिती आपण या लेखात दिली आहे त्याबद्द्ल मी समस्त शिवसैनिकातर्फे आपला आभारी आहे. ज्या शिवसैनिकानाही सर्व माहिती नाही त्यांनांही हा लेख मार्गदर्शक आहे.

  2. नेता कसा असावा तर बाळासाहेबांच्यासारखा असावा.

  3. मस्त लेख आहे मित्रा ! शिवसेनेत लिहणा-यांची पिढी येणार आहे ह्याचे संकेत आहे हे :)साहेबांच्या जन्मदिनानीमीत्त सगळिकडे हा लेख गेला पाहिजे.. विदर्भात इकडे मि माझे लेख देतोच…\साहेबांसाठी खास…ठिणगी पडली अस्मितेची, यद्न्यकुंड धगधगले सारे |पराक्रमाच्या ज्वाळा उठती, फुंकर घाली भगवे वारे |बघा रुषी तो यद्न्यी बैसला, त्यागाची आहुती द्यारे |हिन्दुह्रुदयसम्राट असे तो, नाव तयाचे बाळ ठाकरे….. |

    • जय महाराष्ट्र साहेब
      अम्हाला पन लेख पाटवत जा साहेबांच

  4. bal keshav thakare…ek vyang chitrakar.

    balasaheb……apla asamanya neta…

    sundar lekh.
    साहेबांच्याबद्द्ल सर्व माहिती आपण या लेखात दिली आहे त्याबद्द्ल मी समस्त शिवसैनिकातर्फे आपला आभारी आहे.

    jai maharashtra……

  5. या उत्तुंग व्यक्तिमत्वाने ………………..
    मराठी माणसामधे स्वाभिमानाचा व्हनी चेतवला ……………………..
    मराठी माणसाला मानाने जगायला शिकवले…………………….
    हिंदुत्व हेच राष्ट्रियत्व असे ठणकावुन सांगितले…………………….
    जाज्वल्य देशाभिमान प्रत्येक मराठी व अमराठी माणसामधे जागवला ……………
    बाबरी पडल्यानंतर त्याचे श्रेय आपल्या सैनिकांना देताना परिणामांचा विचार केला नाही……..
    आणि उगिचच जातीपातीचे घाणेरडे राजकारण कधी केले नाही…………..
    अतिशय विश्वासु असलेले जुने सहकारी साथ सोडुन अर्ध्या वाटेतुन निघुन गेले तरी बाळासाहेब डळमळले नाहित……
    अतिशय प्रांजळपणे आपली मते मांडणारा हा स्पष्टवक्ता असलेला भारतिय राजकारणातला एक असामान्य नेता ……..
    कुणाचीही भिड न बाळगणारा ,व परिणामांची तमा न बाळगणारा हा एकमेव द्र्ष्टा नेता ………..
    शरीर थकले असले तरी उमेद अजुन कायम आहे बाळासाहेबांची आणि हिच उमेद पुन्हा एकदा मराठी माणसाला कर्तृत्वाच्या उच्च शिखरावर भविष्यात नेउन बसवेल ………..
    महाराष्ट्राची माता आईभवानी या ढाण्या वाघाला उदंड व निरोगी आयुष्य प्रदान करेलच अशी खात्री आहेच.
    मनोमन या व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा……………
    जय हिंद!
    जय महाराष्ट्र!
    “अनामिका”

    • Shiv Sena
      गेलो नाही जानार नाही गद्दारांची वाट लावल्याशिवाय आता माघार नाही मोडेन पण वाकनार नाही एकटा जरी उरलो तरी फिकीर नाही मेलो तरी भगवा सोडनार नाही….!

  6. अंगावर  शहारे आणणारे  शब्द ………… अप्रतिम  blog आहे ……… खूपच  छान……. 

  7. Ha lekh khup sundar ahye pan lekhak ek gostha visrala…
    Bala saheb je bolayche tasa aaj sampurna Hindhusthanat kontahi neta bolu hsakat nahi..na RSS wala ki Na VHP wala..
    Te mhanje tyanchya pratek bhashanatil “Landya” ha muslimana sambodhlela shabdha ani Pratek Mashidi madye sainya ghusva.

    Jai Maharashtra.

  8.                    साहेबांच्याबद्द्ल सर्व माहिती आपण या लेखात दिली आहे त्याबद्द्ल मी  आपला आभारी आहे. अभिमान आहे.” ok…………………………….ok

  9. हिंदुहृदय सम्राट ,शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन .
    साहेब मानाचा मुजरा …..

  10. Saheb ekch ani je lihile aahe tya sathi ek Mumabi karach Dhanyawad.
    Ek reqest saglyani sahebamcha photo screen saver theva …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अरे काहि तरि लिहि कि.. .

महाराष्ट्राचा “कंदिलराव”