in

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

Jai Jai Maharashtra Majhaजय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।

रेवा वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा।।

भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंव्ह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा।।

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दरिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ।।

* कवी – राजा बढे * संगीतकार – श्रीनिवास खळे
* मूळ गायक -शाहीर साबळे व समूह

 

 

Written by Ashish

One Comment

Leave a Reply
  1. मा.श्री.राजसाहेब ठाकरे याना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो अशी मीश्वर चरणी प्रार्थना करतो….

Leave a Reply to Pravin sanap Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

असेल कुणीतरी…