in

राजे पुन्हा जन्मास या..

आपल्या महाराष्ट्र माझा चे नियमित वाचक स्वप्निल देमापुरे (वय २२) यांनी खास महाराष्ट्र माझाच्या वाचकांसाठी शिवजयंती निमित्त लिहिलेली कविता..आपणा साठी.

जन्म घ्या तुम्ही जन्म घ्या

राजे पुन्हा जन्मास या

शिरि शिरपेच हाती समशेर शोभती

अश्वरुढ होई राजा शिवछत्रपती

हे राजे, तुम्हा हिन्दुह्रुदय पुकारती

भगवा धरुन हातात या..राजे पुन्हा जन्मास या. || १ ||

कावा गनिमी करुनी, धर्मरक्षिण्यास

फाडिले अफजल खानास तसा

आज सरकार म्हणे त्यास फासी नको.

फाडण्या पुन्हा खानास या

राजे पुन्हा जन्मास या. || २ ||

नाव घेती तुमचे किती, परी

चरित्र कुणा का ना उलगडे तरी?

राजकारण करी, ती नावावरी,

शिकवण्या धडे राजकारणाचे या

राजे पुन्हा जन्मास या. || ३ ||

पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माणास या

मराठि अस्मिता जागविण्यास या

नको बांधणि किल्ल्याची आम्हा आता

माणुस मराठि एकदा जोडण्यास या

राजे पुन्हा जन्मास या. || ४ ||

जाणत्या राजास ला़ख्-लाख मुजरा असो

स्विकारण्या माझ्या मुजर्यास या

राजे पुन्हा जन्मास या.

जन्म घ्या तुम्हि जन्म घ्या

राजे पुन्हा जन्मास या. || ५ ||

स्वप्निल देमापुरे, यवतमा़ळ

13 Comments

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तलवार तिरडी आणि वळु.

अरे काहि तरि लिहि कि.. .