in

अजब रे हा साधु.

कालच ज्येष्ठ साहित्यिक आणि समिक्षक अरुण साधु यांची प्रतिक्रिया वाचली. प्रतिक्रिया कळण्या अगोदर क्रिया कळणे आवश्यक आहे, त्या मुळे पहिल्यांदा ती सांगतो. आपले मराठि साहित्य सम्मेलन अमेरिकेत घ्यायचे ठरले आहे. या क्रियेवर या महाशयांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. “यंदाची वारी हुकणार.” यांची मागच्या वारीतील ’हालचाल’ आठवली आणि त्यांच्या या बोलण्याची फ़ार गम्मत वाटली.
या साहेबांना मागच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जवाबदारी नवीन अध्यक्षांना सोपवायची होती. (सांगली येथे भरले होते ते). माळ आपल्या गळ्यातुन काढायची, आणि दुसर्याच्या गळ्यात घालायची. एवढेच काय ते काम. याच्या अगोदर किती साहित्य संमेलनास यांनी उपस्थिती लावली होती? तर स्वतःच सांगतात, मी अध्यक्ष होण्या अगोदर एकाही संमेलनाला उपस्थित राहिलो नहिए. तरी हि यांच्या गळी अध्यक्ष पदाची माळ पडली. या वर्षी साहेब भलतेच उत्साहात आले. बरेच काहि बोललेहि. पण आपण आजतागायत एकाहि संमेलनास उपस्थित रहिलेलो नाहिये, आणि आता डायरेक्ट अध्यक्षपद.. हे कदाचित जाणवलेकि काय देव जाणे पण साधुंनी बरोबर आदल्या रात्री संमेलनातुन पळ काढला. जाता जाता ’बहिष्कार’ हा गोंडस शब्द मात्र उच्चारायला विसरले नाहित. ज्याने सुरवात होते त्या ग्रंथदिंडीत मात्र सामील झाले. कुठे कोणाला काहि बोलले नाहित, चेहर्यावर नापसंदिची एक साधी रेष हि नाहि, आणि गेलेकि पळुन काहि तास अगोदर. तर असा हा माणुस आज पुन्हा प्रतिक्रिया देतायत कि वारी चुकेल म्हणे.
हि लोके अमेरिकेत जातील कि नाहि माहित नाहि, पण जर जाणार असतील तर या अश्या साधु-संताना पहिल्यांदा वेचुन बाजुला काढा नाहितर हि लोके ऐनवेळि नक्कि तमाशा घालणार. एक काळि यादिच बनवा नाहितर. या असल्या लोकांची कितीही मने सांभाळा, हि लोके चार चौघात आपले नाव ’रोशन’ केल्या शिवाय राहणार नाहित.
अमेरिकेत जाउन तिथल्या लोकांसमोर फ़ुकटचा तमाशा नको. ते संमेलन होइल तेंव्हा होइल पण आत्ताच या लोकांचा तमाशा चालु झाला आहे. होय, तमाशाच. संमेलन अमेरिकेत भरवणार म्हटल्यावर काय तो दंगा. पुढचे पाउल पडतय पडुदेना. पण नाहि, अडवा पडला नाहितर मराठी माणुस कसला? मराठी माणसाला खेकड्याची उपाधी का देतात ते अत्ता समजत आहे मला, अरे रंगित तालीमच होतिये म्हणाना. जात आहेत अमेरिकेत जाउदेत कि. का यांच्या पोटात गोळा. पोहुचुदेत ना जगातल्या कानाकोपर्यात. कारण देत आहेत कि याने सामान्य माणुस तुटेल, तो येऊ शकणार नाहि वगैरे वगैरे. इथे राहुनहि किती सामान्य मराठी माणसाला सांभळले या लोकांनी? कुठे यांचे साहित्य सामान्यांच्या आवाक्यात आहे. पुस्तक विक्री: पाने २००, किम्मत २५०. वारे वा!
उद्या जर एखादा अंबानी उठला आणि म्हणाला कि “मि या साहित्यीकांचा खर्च उचलतो” तर? तर हे जे आत्ता घसा काढुन बों.. ओरडत आहेत ना हिच लोके पिशव्या भरुन पहिला मी-पहिला मी करत रांगा लावतील अमेरिकेत जाण्यासाठी. दुःख याचे नाहिये कि संमेलन अमेरिकेत चाललय.. पण दुःख याचे आहे कि ’हे चाललेत (फ़ुकट)पण मला जाता येत नाहिये’. मागचे संमेलन भरले होते नाहो भारतातच.. महाराष्ट्रातच, मग का सुखाने नाहि पार पाडले? का त्यात एक दिलाने नाहि सहभागी झालात?
होय मला अभिमान आहे कि माझ्या मराठि साहित्याचे संमेलन अमेरिकेत होणार आहे. जावा अमेरिकेत जावा. मराठिचा आवाज पुर्ण जगात घुमवा, बुलंद करा. या ओरड्यांसाठी घेउना एखादा छोटा कार्यक्रम महाराष्ट्रात. ते असते ना..कि लग्न गावाकडे आणि एक छोटे रिसेप्शन मुंबईत. तसेच कहिसे इथेहि कराना एवढा दंगा करायच्या ऐवजी. हि साहित्य संमेलने वगैरे काहि साहित्याच्या पुजे साठि अथवा श्रेष्ठत्वा साठि होत नाहित आजकाल तर तुझ्या पेक्षा मि साहित्यीक श्रेष्ठ हेच एकमेकाला दाखवुन द्यायचे आखाडे झालेत. नाहितर अध्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

झंझावताची ४२ वर्षे..

हिन्दुंना कोण वाली आहे का नाही?