माझ्या ब्लॉगवर जमलेल्या मराठी बंधु, भगीनींनो आणि मातांनो.
मराठी माणुस संध्याकाळी …
“अरे तुने वो वळु देख्या क्या? अरे मस्त पिक्चर है वो. मिस मत कररे. आपण मराठी पिक्चर देखना मंगता. वो पिक्चर मस्त हैरे माझ्या मित्रा. जरुर देखना क्या..”
” ओ भय्या वो चाट में जरा तिखट पाणि कम डालना…अरे ज्यादा पातळ मत करो”
“उत्तपा अच्छे से परतना..ज्यादा करपाओं मत उसको”
(स्वताःच्या कानाने ऐकलेली वाक्ये आहेत मनाने काहि लिहीत नाहिये)
काल परवा राजकिय फ़ड रंगला अगदि फ़ार दिवसांनी रंगला. काही महाराष्ट्र देशात इम्पोर्ट्रेड नेत्यानी बर्याच उड्या मारल्या. या नेत्यात विशेष नाव घ्यावे असे नेते म्हणजे अमर सिंग आणि अबु आझमी. हे नेते येतात काय काहि तासांसाठि आणि काहिहि बरळतात काय.. बर जाउदे त्या अबुचे काय? एक नेहमी बघितलय..मुंबईत काहि वाईट काय होणार असेल तर या अबुचे तोंड चालु होते आणि मुंबईचे वातावरण बिघडते. मागे बॉंम्ब स्फ़ोट झाले त्यावेळि हि असेच. कालही बातमी, मुंबईत घातपाताचा कट उधळला म्हणुन.
या अबुने म्हणे ललकार केलिये उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात. कि आम्हि काठ्या वाटु…या काठ्या यांच्या म्हशी हाकण्या साठि तरी नक्किच वाटल्या जाणार नाहित. या वाटल्या जाणार मुंबापुरितल्या माझ्या मराठि माणसांवर उचलण्यासाठि. आणि अबुचे हे जर असले विचार असतील तर या असल्या काठ्या उचलणार्यांना धोबीघाटावर पिळुन काढा आणि त्याच काठ्यांनी त्यांना वाळत घाला. येतायत रोज रेल्वे भरुन भरुन येतात मुंबईत. पहिला एकटा येतो आणि नंतर पत्र पाठवुन आणखि पंधरा जणांना बोलवुन घेतो. हम दो हमारे पच्चिस मानणारे हे आणखि एक. दोघेहि धोकादायक. समान धोकादायक.
अबुने भाषा केली आम्ही काठ्या वाटु तर इकडे राजाने घोषणा केली कि आम्हि तलवारी वाटु. वाटले तर दोघांनीहि काहिनाही, ना हि दोघे यातले काही वाटु शकतात. हि गोष्ट या दोघांनाही माहित असणार अगदि पध्द्तशीर पणे माहित असणार. पण तु एक हुषार तर मी चार हुषार हि सांगण्याची हौस आडवी येतेना. तु काठ्या वाट मि तलवारी वाटतो. तु बांबु वाट मि त्याच बांबुच्या तिरड्या बांधतो. हि भाषा वापरली गेली. तलवार काय तिरडि काय दोन्हिही घातक..घातक माझ्या मराठि माणसाकरता. या नेत्यांच्या भांडणात नाशिकात प्राण गमवावा लागला तो एका मराठि माणसालाच. होय मराठि माणुस मेला दगड फ़ेकिमध्ये. मराठि वाचली पाहिजे…मराठि वाचली पाहिजे म्हणत हाणला दगड मराठि माणसाच्या डोक्यातच. बिचारा मराठि माणुस रक्त सांडुन मेला. आता कोण बघणार त्याच्या बायको मुलांकडे? का म्हणुन त्यानी स्वताःला अनाथ म्हणुन घ्यायचे? का तर या नेत्यांना मधुनच नवनिर्माणाची हुक्की येते म्हणुन? या नेत्यांनी पत्रक काढुन केले घोशित कि हि आमचि माणसे नाहित हि तर गुंड. वा रे राजा. जर नुसते शक्ती प्रदर्शन झाले असते तर बघा माझी ताकत कुठे पर्यंत आता मात्र हि गुंडं, आमच्याशी काहि संबंध नाहि. म्हणे यांना हा मृत्यु आयुष्यभर सलणार आहे अरे पण हाच मृत्यु त्यांच्या घरच्यांना आयुष्यभर सोलुन काढणार आहे. नुस्त्या आठवणी येणार माणुस कधीच नाहि.
बर बाबा यात खरच कुठे मराठि माणुस रस्त्यावरती उतरलाय म्हणावे तर सगळि न्युज चैनल वाले खुश कारण मराठि प्रेक्षक खुप मिळाला. कारण सगळे जण आपाआपल्या घरि बसुन टिवी बघतायत. पण आता काय इराक नंतर सगळ्यात मोठा दंगा हा मुंबईतच चालु आहे असा देखावा या न्युज चैनल्स वरती. लाजा वाटल्या पाहिजेत स्वता:ला चौथा खांब म्हणवुन घ्यायला (लोकशाहिचा). एकच टॅक्सी किमान हजारवेळा फ़ोडली गेली असेल आणि तेच तेच चेहरे विटा फ़ेकतायत. नक्कि किती दंगा चाललाय राजाला अटक झाल्यावर हे बघायला ठरवुन डेक्कन ला चक्कर टाकली..दंगा सोडा दुकानेहि सताड उघडि आणि गिर्हाइके हि भरपुर. आक्षेप फ़क्त एवढाच कि चार आण्याचा दंगा पण झालेला नसताना चार रुपयाच्या नुकसानाचा देखावा का म्हणुन उभा करावा? रस्त्यावर आंदोलन उभे करायला जिवाला जिव देणारि लोके असावि लागतात. केवढि लोके अमिताभ वर जिव ओवाळुन टाकतात हे बघुन त्याची मिमिक्री करणार्याने हे कदापिही समजु नये कि हि अशिच लोके आपल्या मागे हि उभी राहतील. जो दिवस भर दमुन दोन घटका मनोरंजनाला उभा राहिलेला असतो तोच केवळ या मिमिक्रीला टाळ्या वाजवतो. जेंव्हा आशिर्वाद द्यायची वेळ येते तो अधिकार केवळ आणि केवळ खर्या बच्चनचाच. हाच न्याय राजकारणात हि लागु पडतो.
यातुन मराठि माणसाला काय मिळाले? काय शिकला तो? काहि नाहि.
नेत्यांचे फ़ोटो मात्र पेपर मध्ये. असेल बाचाबाची झालेली पण ति केवळ मनसे आणि सपा यांच्या मध्ये. मराठि आणि अमराठि यांच्यात नव्हे. सुरवातीलाच सांगितलीयेत काही वाक्ये. हि कोण बोलतात तर मराठि माणसेच. येत नाहि आपल्याला हिन्दी तर बोलता कश्याला? का बोलायला पाहिजे. बोला कि रोखठोख मराठि मध्ये. का नाहि समजणार पुढच्याला. त्याला ति समजावुन घ्यावीच लागेल. माझ्या या मराठि माणसाची अवस्था अगदि वळु सारखि झालिये. अंगात आहे फ़ार ताकत पण कोणिही येतेय काय आणि दगड मारुन जातय काय.. होय येतायत बिहार मधुन माणसे, कामगार. पण का येतात? या प्रश्नावर कोण विचार करणार आहे का नाही? बिहारहुन या इकडे आणि टाका फ़ुटपाथ वर टपरी. येतेय गिर्हाइक. हे गिर्हाइक कोण तर पुन्हा मराठि माणुसच. जर तुम्हाला या बिहार्यांचा एवढाच त्रास होतोय तर का यांच्या दुकानात जाता? का हा माझा वळु भेळ चरायला बिहारी कडे जातो..का पानाचे रवंथ करायला बिहार्यांच्या टपरिवर जातो..? अरे थांबवा हे, आपोआप हि लोके निघुन जातील.
पण हि निघुल गेली तर….कोण फ़ुटपाथ वर दुकान लावले म्हणुन हवालदाराला मिठाई देणार? कोण अधिकार्याला चिरिमिरि देणार? कोण झोपडि बांधणार…मग कोणासा्ठी आंदोलने करुन मते मागणार? यांना पैशे खाउन रेशन कार्डे काढुन मतदार बनायचा अधिकार देणारा अधिकारि हि मराठिच असावा? नक्की मराठि माणसाच्या मुळावर कोण उठलयं..हि बाहेरुन येणारि भय्या लोके कि पैसे खाउन यांना गब्बर बनवणारा मराठि अधिकारी, मराठि माणुस? अरे टॅक्सी वाला तुमच्या पैश्यावर जगुन तुम्हालाच मग्रुरी दाखवतो कारण एकच..तुमची त्याच्याकडे बघायचिहि ताकत नाहि, आत्मविश्वासच नाहि या वळु कडे. हा वळु नुसता बघुन मानच हलवत बसणार.
मराठित बोला. मराठित लिहा. मराठिचा अभिमान बाळगा. मराठि इतकेच इंग्रजी वर हि प्रभुत्व मिळवा. आत्मविश्वास कमवा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. या मराठि माणसाचा शत्रु कोणि बाहेरचा माणुस नाहिये तर पैशे खाउन त्यांची हांजी हांजी करणारा मराठि माणुसच आहे. त्याला वटणीवर आणा. सगळे मग आपोआप वटणीवर येतील. या अधिकार्यांना जनतेची भिती वाटली पाहिजे. इतका माझा मराठि माणुस जागृत झालेला मला बघायचा आहे. मग बघु कुणाची हिंम्म्त आहे या वळु वर दगड टाकायची.
आला अंगावर तर घ्या शिंगावर…पण पहिले आतले शत्रु आडवे करा.
अशिष कुलकर्णी.
6 Comments
Leave a Reply