बाभळी बंधार्यावर जाण्याचा हट्ट धरणार्या चमकेशबाबूंचे लाड पुरवता पुरवता महाराष्ट्र सरकार जेरीस आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्राबाबू नायडूंना त्यांच्या ताफ्यासह संभाजीनगरला हलवण्याची तयारी सुरू असतानाच त्यांनी एसी गाडीची फर्माईश केल्याने पोलीस चक्रावले. जामीन घेणार नाही असा पवित्रा घेणार्या चमकेशबाबूंची तुरुंगात जाण्याची वेळ येताच चांगलीच तंतरली. दरम्यान, पोलिसांनी एसी गाडी देण्यास नकार देताच चमकेशबाबूंना ‘चक्कर’ आली आणि जमिनीवर लोळण घेत त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली.
बाभळी बंधार्याची पाहण्यासाठी जमावबंदी आदेश मोडून महाराष्ट्रात घुसखोरी करणारे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह तेलगु देसमच्या आमदार, खासदारांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. क्रांतिकारक असल्याचा आव आणत चंद्राबाबूंनी आपल्यावर कोणताही गुन्हा लावा, जेलमध्ये टाका पण जामीन घेणार नाही, असा आव आणला होता. जामीनास नकार दिल्यानंतर त्यांना धर्माबादच्या आयटीआयमध्ये फाईव्हस्टार व्यवस्थेत ठेवण्यात आले होते. आज त्यांची दोन दिवसांची कोठडी संपल्यानंतर नायडू यांना पुन्हा न्यायालयासमोर उभे करण्यात आले. त्यांनी पुन्हा जामीन नाकारल्याने न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 26 जुलैपर्यंत वाढ केली. त्याचबरोबर त्यांना धर्माबादच्या बाहेर हलवावे, असा आदेशही दिला.
यांचे लाड पहा: महाराष्ट्राच्या गाड्या भंगार आहेत, मी अशा गाडीत बसणार नाही. माझ्यासाठी एसी गाडी आणा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येथे येऊन आमच्याशी बोलल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही.
3 Comments
Leave a Reply