in

हिन्दुंना कोण वाली आहे का नाही?

नमस्कार, परवा जम्मु-कश्मिर मधील सरकार पडले, आणि शिवसेना नेते सरपोतदार यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा हि ठोठावण्यात आलि. आपले होणारे पंतप्रधान लाल कृष्ण अडवाणी यांची एक छोटिशी सभा हि झाली. या सगळ्या गोष्टिंमध्ये एक गोष्ट कॉमन ती म्हणजे मुसलमानांचे लाड आणि हिन्दुना लाथ.
जम्मु काश्मिर मध्ये सरकार पडले कारण काय तर अमरनाथ यात्रे करता जी एक समिती आहे त्यांना काहि एकर जमिन देण्यात आलि. बास होते एवढेशे कारण या जतियवाद्यांना. तुम्हि यांना जमिन दिली म्हणजे आता काय जणु इस्लाम बुडालाच असा दंगा केला या लोकांनी. काय काम केले होते सरकारने तर फ़क्त हिन्दु यात्रेकरुंसाठी सुखसुविधा देता याव्यात म्हणुन काहि जमिन दिली अमरनाथ ट्रस्टला. पण या निधर्मवादाच्या बुरख्याआड दडुन बसलेल्या जहाल जातीयवाद्यांना हे कसे सहन होइल? आंदोलने झाली, दंगा झाला तो पण एवढा कि अगदी कर्फ़्यु लावावा लागला. का तर केवळ एक जमिनीचा तुकडा दिला म्हणुन. लगेच सरकारला धमकी “तुम्ही जमिन परत घ्या, नाहितर मि पाठिंबा परत घेते” आणि या PDP वाल्यांनी सरकारचा पाठिंबा काढुन घेतला कारण ठरले हिन्दुना जमिन दिली हे. का म्हणुन हा दंगा झाला या देश्यात. अमरनाथ यात्रेला हिन्दुस्तानात जमिन द्यायची नाहितर काय मग पाकिस्तानात? ८२% लोकांच्या भावनेशी निगडित विषय, पण काय झाले याचे? तर काहि नाही, सगळेच ढिम्म. या PDP वाल्यांचे नाव काय तर Peoples Democratic Party आता यांना ‘Pakistan’s Democartic Party’ म्हटले पाहिजे. हिन्दुस्तानात् रहायचे आणि निष्टा मात्र पाकिस्तानच्या चरणी अर्पण करायच्या. निधर्मवादाच्या नावाखाली हा कसला जातियवाद? बाकिच्या वेळि घसा ताणुन निधर्मवादाचे पोवाडे गाणारे आता कुठे आहेत? जर हिच जमिन मुसलमानांसाठी नाकारली गेलि असती तर काय झाले असते? या देशात जातियवादाचे पिक जोमाने आलेय आणि निधर्मवादाचा जणु काय मुडदाच पाडलाय (बलात्कार करुन) असा काहुर माजवला गेला असता. का तर हा अन्याय समाजातल्या १८% वोटबॅंकेवर केला गेला म्हणुन. प्रत्येक गोष्ट मोजतील वोट बॅंकेच्या तराजुतच.
आता हिन्दुनाहि एकवटावेच लागेल, पुन्हा एकदा.

शिवसेना नेते सरपोतदार यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा हि ठोठावण्यात आली, कारण म्हणे प्रक्षोभक भाषण केले. का नाही करणार हा माणुस असे भाषण? अरे कोणि पण यावे आणि आमच्या अराध्य दैवतांचे विडंबन करावे? अश्यावेळी काय भाषा आणि काय व्याकरण. जे डोळ्याला दिसते तेच बोलणार ना माणुस. आणि ते बोलले म्हणुन शिक्षा पण गणपतिच्या मुर्तीचे विडंबन केले म्हणुन किती जणांना झाल्या ’शिक्षा’?

अरे हे असेच चालणार असेल तर मला प्रश्न पडतो या हिन्दुस्तानात कोणि हिन्दुंना वाली आहे का नाहि?

Written by Ashish

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अजब रे हा साधु.

संभाषण”कला”