दै सामना मध्ये मा. हिन्दुह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखात चालु झाली आहे. त्यातील काहि अंश.
–सभांना गर्दी होते आमच्या, पण ती गर्दी होऊनसुद्धा परत काँग्रेसचंच सरकार येतं महाराष्ट्राच्या बोडक्यावरती ? एवढ्या शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या. भारनियमन आहेच. लोक काळोखात बसतील, चिडतील पण नंतर काही नाही. पुन्हा काँग्रेस… अशी खंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज सामना मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलूनत दाखवली.
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला आहे. ८२ वर्षांच्या शिवसेनाप्रमुखांनी या मुलाखतीत अत्यंत शिवराळ भाषेचा वापर केला आहे. अर्वाच्य भाषेत केंद्र सरकार व राज्यकर्त्यांना शिव्यांची लाखोलीच त्यांनी वाहिली. आणीबाणी पुकारा ! ‘ नपुं **’ आणि ‘ भड *’ काय देश चालवणार ? असे या मुलाखतीचे हेडिंग आहे.
जोपर्यंत काँग्रेसचं सरकार या देशात राहील तोपर्यंत असंच राहणार. आपले ‘**’ सरकार असल्यामुळेच पाकिस्तान शेफारले. आव्हानं देऊन चालत नाही, नुसते इशारे देऊन चालत नाही. हल्ला करुन बघा, हिंमत दाखवा, असे त्यांनी केंद्र सरकारला बजावले. हे सर्व थांबवायचं असेल तर पहिली आणीबाणी पुकारा. कुणालाही सोडू नका. देशहितासाठी सांगतोय, असा ठाकरी उपाय त्यांनी सुचवला.
अमेरिकेत फक्त एकदा आणि लंडनमध्येही एकदा रेल्वे स्टेशनांवर बॉम्ब फुटले. एकदा आणि शेवटचेच… नंतर कुणाचीच तिकडे असे हल्ले करण्याची हिंमत झाली नाही. पहिल्यांदा तुम्ही हा देश सार्वभौम आहे ही भावना लक्षात घेतली पाहिजे. आमच्यात ती भावना मुळात आहे काय ? कारण सार्वभौम देशाच्या संसदेवर हल्ला करणा-या अफझल गुरुला आपण अद्याप फाशी देऊ शकलो नाही. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावूनही ताबडतोब जर त्या अफझलला फाशी दिली असती तर तुमची हिंमत कळली असती. कसली अडचण आहे अफझल गुरुला फाशी देण्याची ? कसला दबाव आहे तुमच्यावर ? मुसलमानांच्या मतांच्या लाचारीसाठी ते ‘ भड *’ करताय, याची मला चीड आहे, असे ते संतापून म्हणाले.
पवार कृषिमंत्री की क्रीडामंत्री?
देशाचा कृषिमंत्री हा महाराष्ट्राचा नेता असतानाही राज्यात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहेत. हे कृषिमंत्री आहेत की क्रीडामंत्री, असा सवाल करीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रविवारी सासवड येथील सभेत घणाघाती टीका केली.
सासवड येथील पालखी चौकात उद्धव ठाकरे यांची प्रथमच जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मुुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या मृत्यूबाबत शंका घेणाऱ्या अंतुलेचा राजीनामा घेण्यासाठी काँग्रेस धजत नाही. कारण त्यामुळे त्यांना हिरवी मते गमावावी लागतील. अशा प्रकारे जर सरकार वागत असेल तर आम्हांला आता हिंदुत्त्वाची तलवार उपसून सरकार पाडावे लागेस, असे ठाकरे यावेळी म्हणाले.
मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यांनतर २४ तासाच्या आत काँग्रेस सरकारने अतिरेक्यांची ठाणी उडवून द्यायची कारवाई करायला हवी होती. मात्र काँग्रेसचे नेते नुसतेच बोलण्याचे काम करतात, असे ठाकरे म्हणाले.