बाभळी बंधार्यावर जाण्याचा हट्ट धरणार्या चमकेशबाबूंचे लाड पुरवता पुरवता महाराष्ट्र सरकार जेरीस आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्राबाबू नायडूंना त्यांच्या ताफ्यासह संभाजीनगरला हलवण्याची तयारी सुरू असतानाच त्यांनी एसी गाडीची फर्माईश केल्याने पोलीस चक्रावले. जामीन घेणार नाही असा पवित्रा घेणार्या चमकेशबाबूंची तुरुंगात जाण्याची वेळ येताच चांगलीच तंतरली. दरम्यान, पोलिसांनी एसी गाडी देण्यास नकार देताच चमकेशबाबूंना ‘चक्कर’ आली आणि जमिनीवर लोळण घेत त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली.
बाभळी बंधार्याची पाहण्यासाठी जमावबंदी आदेश मोडून महाराष्ट्रात घुसखोरी करणारे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह तेलगु देसमच्या आमदार, खासदारांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. क्रांतिकारक असल्याचा आव आणत चंद्राबाबूंनी आपल्यावर कोणताही गुन्हा लावा, जेलमध्ये टाका पण जामीन घेणार नाही, असा आव आणला होता. जामीनास नकार दिल्यानंतर त्यांना धर्माबादच्या आयटीआयमध्ये फाईव्हस्टार व्यवस्थेत ठेवण्यात आले होते. आज त्यांची दोन दिवसांची कोठडी संपल्यानंतर नायडू यांना पुन्हा न्यायालयासमोर उभे करण्यात आले. त्यांनी पुन्हा जामीन नाकारल्याने न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 26 जुलैपर्यंत वाढ केली. त्याचबरोबर त्यांना धर्माबादच्या बाहेर हलवावे, असा आदेशही दिला.
यांचे लाड पहा: महाराष्ट्राच्या गाड्या भंगार आहेत, मी अशा गाडीत बसणार नाही. माझ्यासाठी एसी गाडी आणा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येथे येऊन आमच्याशी बोलल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही.
chamkeshbbu sarv electionsathi karat aahe he kahi lapun rahilele nahi
चक्कर आली .पण त्यांनी कमीत कमी आंदोलन केले.यात त्यांचा राजकीय स्वार्थ:आहेच .पण महाराष्ट्रातील षंढ नेत्यांनी बेळगाव एवढे पेटलेले असताना केंद्र सतत महाराष्ट्रा विरुद्ध कारस्थान करत असताना काय केले? चंद्राबाबू सारखे बेळगावात जावून आंदोलन का केले नाही. केवळ मुंबईत सरकारी
सशस्त्र पोलिसांच्या संरक्षणात राहून डरकाळ्या फोडणे एव्हादाचा यांचा धंदा झाला. आणि आमदार खासदारांनी सार्व पक्षाच्या आंध्र सारखा राजीनाम्याचे अस्त्र का वापरले नाही.महा. नेत्यांचे जनतेची कांही देणे घेणे राहिले नाही तर भ्रष्ट्राचारशी यांचे नाते निर्माण झाले.आहे.
thanthanpal aplya waril pratikriyat dam aahe asach thanthanit lihit raha subhechha